accident  sakal
मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मृत्यूचा सापळा

अवघ्या सहा महिन्यांत ४१ अपघातांत ५० जणांचा बळी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई-पुणे (Mumbai-Pune) द्रुतगती मार्गावर अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलिस(Highway Police) आणि राज्य परिवहन विभागाकडून खबरदारी घेतली जात असूनही अपघात (Accident) आणि मृत्यूंच्या (Death) संख्येत घट होत नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन (Lockdown) असतानाही गेल्या वर्षभरात मार्गावर १६० अपघात आणि ६६ जणांचा अपघाती मृत्यू झाला होता; तर या वर्षी जानेवारी (January) ते जून (June) या सहा महिन्यांतच ४१ अपघात आणि ५० मृत्यू झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २५ अपघातात २८ मृत्यू झाले होते.

अवजड वाहनांची लेन कटिंग, ओव्हर स्पिडिंग, मद्यसेवन करून वाहन चालवणे, हायवेवरील सूचनांचे पालन न करणे, नो पार्किंग आणि नादुरुस्त वाहने चालवणे, हे अपघातांचे प्रमुख कारण आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अपघातांची संख्या कमी झाली होती; मात्र आता अपघात आणि मृत्यूंची संख्या दुपटीने वाढली आहे.

सध्या कोरोनाचे निर्बंध बऱ्यापैकी शिथिल करण्यात आले असून सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसल्याने अपघात आणि अपघाती मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महामार्ग पोलिस, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि परिवहन विभागामार्फत मुंबई-पुणे महामार्गावर अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असूनही हा महामार्ग चालकांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे दिसून येत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT