Mumbai Pune Expressway Landslide Update  
मुंबई

Mumbai-Pune Expressway Traffic Update : 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर आज पुन्हा २ तासांचा ब्लॉक; जाणून घ्या महत्वाची अपडेट

रोहित कणसे

Mumbai-Pune Expressway Traffic Update : मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जागोजागी पाणी साठून जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहयला मिळत आहे. यादरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. तुम्हा देखील आज मुंबई पुणे प्रवासाचे नियोजन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.

मुंबई पुणे महामार्गावर काल रात्री पुन्हा दरड कोसळल्याने आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी २ ते ४ यावेळेत हा ब्लॉक असणार आहे. तसेच या वेळेत महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे. प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळण्याची घटना ताजी असताना गुरूवारी रात्री कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली. गुरूवारी रात्रीच्या सुमारासदरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली असली मात्र अजूनही कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ काही प्रमाणात कोसळलेल्या दरडीचा भाग रस्त्यावरच आहे.

त्यामुळे आज दुपारी २ ते ४ यावेळेत मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळे पासून वळवली जाणार आहे. तर मुंबई शहराकडे येणारी वाहने जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने सुरू असेल आणि ती लोणावळ्याजवळ पुन्हा द्रुतगती मार्गाशी जोडली जाईल. तसेच महामार्गाहून पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरूच राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT