Mumbai-Pune Expressway block Esakal
मुंबई

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज दोन तासांचा ब्लॉक; 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

आज दुपारी 12 ते 2 दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेवरती मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वरती आज (10 ऑक्टोबर) दुपारी 12 ते 2 या वेळात पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

दरम्यान जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन हलक्या वाहनांसाठी शिंग्रोबा घाटातील वाहतूक सुरु असणार आहे. आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. एमएसआरडीसीने याबाबतची माहिती दिली आहे.

एमएसआरडीसीच्या माहितीनुसार, अमृतांजन पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे म्हणजे किलोमीटर ४५ आणि ४५.८०० किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे. या कामावेळी पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाणार आहे. तर हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार आहे.

मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक २ तासांसाठी बंद असली, तरी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू असणार आहे. फक्त कारसाठी जुना पुणे - मुंबई महामार्ग शिंग्रोबा घाटातील सुरू राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

Dharavi Crime: धक्कादायक! क्षुल्लक वाद टोकाला गेला अन् धारावीत रक्ताचा सडा पडला; मित्रानेच तरूणाला निघृणपणे संपवलं, काय घडलं?

Ranjangaon News : रांजणगाव एमआयडीसीत खंडणीसाठी दहशत; महिला व्यावसायिकेला धमकी, चालक व सुपरवायझरला मारहाण

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT