अत्याचार प्रकरणात आरोपींना लवकर शिक्षा टिम ई सकाळ
मुंबई

मुंबई : अत्याचार प्रकरणात आरोपींना लवकर शिक्षा

‘शक्ती’ला बळकटी देणारे विधेयक मंजूर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने आणलेल्या शक्ती विधेयक सक्षमतेने वापरण्यासाठी यंत्रणा उभी करता यासाठी एका महत्त्वाच्या दुरुस्ती विधेयकाला गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. यातील तरतुदीनुसार विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार असून महिला अत्याचारातील प्रकरणातील अपराधाचे गांभीर्य ओळखून त्याचा तपास विशेष पथकाकडे दिला जाणार आहे.

‘महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, २०२०’ (२०२० चे विधेयक क्र. ५२) असे या विधेयकाचे नाव होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले. ते म्हणाले की, राज्यातील महिलांना सुरक्षा देण्याच्या हेतून राज्य सरकारने विधेयक क्र. ५१ - शक्ती विधेयक याधीच मंजूर केले होते. परंतु त्या विधेयकला सुविधा देण्यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करायला हवी होती. त्यासाठी २०२० चे विधेयक क्र. ५२ हे विधेयक आणण्यात आले आहे. याआधी १४ डिसेंबर २०२० रोजी हे विधेयक सभागृहात मांडले होते. दोन्ही बाजूच्या संयुक्त समितीकडे हे विधेयक चर्चेसाठी पाठविले. समितीने एकमताने केलेला अहवाल मंजूर करण्यात आला.

विशेष न्यायालयाची स्थापना

‘‘या विधेयकाद्वारे विशेष न्यायालय स्थापन होणार आहे. प्रसंगानुसार उपलब्ध न्यायालयांनादेखील हा दर्जा देण्यात येईल. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात गुन्हेगारांना योग्य शिक्षा करणे अत्यंत आवश्यक असल्याने विशेष सरकारी वकील बदलण्याची व त्याऐवजी विशेष सरकारी वकील नेमण्याची खंड ७ मध्ये तरतूद केली आहे. खंड ८ मध्ये विनिर्दिष्ट अपराधांचा तपास करण्यासाठी विशेष पोलिस पथक स्थापन करण्याची तरतूद यात आहे. पोलिस अधिक्षक, पोलिस अधिकारी यांना अपराधाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर अपराधाचे अन्वेषण विशेष पथकाकडे सोपविण्याचे अधिकार असतील,’’ असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT