Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation esakal
मुंबई

मुंबई : पालिकेच्या प्रसूतिगृहांचा दर्जा सुधारणार

राजेश नागरे

मुंबई: मुंबई महापालिकेच्या प्रसूतिगृहांबाबतच्या बऱ्याच तक्रारी असतात, परंतु या तक्रारींवर आता तोडगा काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून पालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये दर्जात्मक सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रसूतिगृहांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिका रुग्णांचा सर्व्हे केला जाणार आहे. ‘कायाकल्प’ आणि ‘लक्ष्य’ कार्यक्रमांतर्गत प्रसूतिगृह आणि दवाखान्यांना दर्जाही दिला जाणार आहे.

प्रसूतिगृहांतील सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विशेषतः शस्त्रक्रियागृह (ओटी) व प्रसूतिकक्षातील सुविधा सुधारून माता आणि बाल किंवा अर्भक मृत्युदर कमी करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. प्रसूतिगृहातील कर्मचारी वर्गाला याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासाठीचा एसओपीदेखील तयार केला जाणार आहे. यातील डॉक्टर, कर्मचारी वर्ग, परिचारिकांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यात सर्वांत महत्त्वाचा भाग रुग्णांचा सर्व्हे असणार आहे.

सर्व्हेअंतर्गत प्रसूतीसाठी दाखल झालेल्या प्रत्येक महिलेला एक शिट दिली जाईल. त्यात त्यांना दिलेल्या सुविधांबाबत समाधानी

आहेत की नाहीत, काय कमतरता आहे, आणखी काय करणे अपेक्षित आहे याबाबतची विचारणा केली जाईल. सध्या या सर्व विशेष बाबींवर काम सुरू आहे. चर्चा आणि बैठका घेऊन प्रसूतिगृहांच्या सुधारणांविषयी निर्णय घेतला जाईल, असे पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी

‘सकाळ’ला सांगितले.

पालिकेची मुंबईत जवळपास २८ प्रसूतिगृहे आहेत. या सर्व प्रसूतिगृहांमध्ये सध्या पालिकेचे सल्लागार भेट देत आहेत. राष्ट्रीय नियमांतर्गत आणि राज्य निर्देशांकांच्या सूचक यादीनुसार प्रसूतिकक्ष आणि ओटीमध्ये लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत का, यासह तेथील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे का याची तपासणी केली जाईल. त्यानंतर एकूण तीन पथके याकडे बारकाईने लक्ष देऊन त्या प्रसूतिगृहांना दर्जा दिला जाईल.

पहिल्यांदा आठ प्रसूतिगृहांचा यात समावेश केला जाईल. त्यानंतर इतर सर्वांचा याअंतर्गत समावेश केला जाईल; मात्र प्रशिक्षण एकाच वेळेस सर्व प्रसूतिगृहांमध्ये सुरू केले जाणार आहे. याबाबतीत सध्या पालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक सुरू असल्‍याचे डॉ. शहा यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअप अकाऊंट; नागरिकांकडे पैशांची मागणी

आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? जलवाहिन्या टाकल्या परंतु पाण्यावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT