मुंबई

मुंबईत पाऊस is Back!! लोकल सेवा सुरळीत; रस्ते वाहतूक मंदावली

विराज भागवत
  • सखल भागात पाणी; चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई: बुधवारी मुसळधार पावसानंतर गुरूवारी राज्यात पावसाने उसंत घेतली. पण एका दिवसाच्या सुटीनंतर पावसाने शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा हजेरी लावली. मुसळधार पाऊस बरसेल अशा इशारा हवामान खात्याने दिला होताच. त्यानुसार, मुंबई (Mumbai) आणि उपनगात (Suburban) पावसाने हजेरी लावली. मुंबई, उपनगर, ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), पनवेल (Panvel) या विभागांमध्ये पहाटेपासूनच पावसाने जोरदार (Heavy Rainfall) हजेरी लावली. याशिवाय, दादर, चेंबूर आणि राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा सखल भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. (Mumbai Rain Weather Forecast Update Heavy Rainfall Alert IMD Monsoon Updates)

रेल्वे वाहतूक सुरळीत; रस्ते वाहतूक मंदावली

मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली. लोअर परळ, दादर, वांद्रे, विलेपार्ले, अंधेरीमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मालाड सबवे आणि अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याचं चित्र दिसलं. तसेच, मानखुर्द, कुर्ला, सायन, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंडमध्येही मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी असल्याचे दिसले. दुसरीकडे नवी मुंबईतही जोरदार सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी धुके पसरले. पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवासास परवानगी नसल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा भार आहे. अशातच पावसामुळे रस्त्यांवर वाहतुक कोंडी होण्यास सुरूवात झाल्याचे चित्र आहे. रेल्वे सेवा मात्र नियोजित वेळापत्रकानुसार सुरू आहे.

शुक्रवारी सकाळी १०-११ वाजेपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सकाळी ७.३०च्या सुमारास घेतलेल्या आढाव्यानुसार, रात्री मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. पण पहाटे जोर वाढला असून सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत चांगला पाऊस बरसेल अशी माहिती IMD चे होसाळीकर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT