मुंबई

पावसाची उसंत; लोकल सेवा सुरळीत, रेल्वे प्रशासन 'अलर्ट मोड'वर

विराज भागवत
  • मध्य रेल्वे आणि मुंबई पालिका यांच्या पावसावरून रंगलं होतं 'ट्विटरवॉर'

मुंबई: सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने (Mumbai Rains) मंगळवार मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढलं. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई, विरार, पालघर, पनवेल, नवी मुंबई या सर्व भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall in Mumbai) झाला. परिणामी, मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकल (Mumbai Local Trains) मंगळवारी बराच काळासाठी ठप्प होती. चाकरमान्यांच्या ऑफिसला जाण्याच्या आणि येण्याच्या वेळेत लोकलसेवा (Local Services) बंद होती. रूळांवरून पाणी हटवल्यावर रात्री उशीरा ट्रेन्स पुन्हा सुरू झाल्या. मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाने उसंत घेतली आहे. तशातच, दुपारच्या वेळी समुद्राला भरतीचा (High Tide) असल्याने रेल्वे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. (Mumbai Rains Local Trains Running well railways management on alert mode)

सध्याच्या घडीला पावसाने उसंत घेतली आहे. लोकल रेल्वे सेवा सर्व मार्गावर सुरळीत सुरू आहे. दुपारी १२ वाजून १७ मिनिटांनी समुद्राला भरती असून त्यावेळी ४.२६ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासन अलर्ट मोडवर असून कुठेही पाणी साठलं तर ते यंत्राने उपसता येईल अशी उपाययोजना करण्यात आली आहे. सर्व घडामोडींवर रेल्वे प्रशासनाचे बारीक लक्ष आहे, अशी माहिती मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT