cold in mumbai sakal
मुंबई

मुंबईत रविवारी दशकातील नीचांकी कमाल तापमानाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबईतील कमाल तापमानात विक्रमी घट झाल्याने मुंबईकरांना भर दिवसा हुडहुडी जाणवली.

मुंबई - मुंबईतील (Mumbai) कमाल तापमानात (Temperature) विक्रमी घट झाल्याने मुंबईकरांना भर दिवसा हुडहुडी (Cold) जाणवली. आज मुंबईतील सांताक्रुझ विभागातील कमाल तापमान 23.8 अंश सेल्सिअस तर कुलाबा विभागातील कलाम तापमान 24 अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले. गेल्या दहा वर्षांतील हे नीचांकी कमाल तापमान असल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विट करून दिली.

मुंबईत आज दिवसभर धूळीचे वादळाचा परिणाम जाणवला. त्यामुळे वाढलेल्या प्रदूषणामुळे मुंबईकर हैराण झाले. मात्र सकाळ पासून मुंबईत प्रचंड गारवा जाणवत होता. भर दुपारी देखील ढगाळ वातावरणामुळे बरेच तास सूर्याचे दर्शन झाले नाही. या दरम्यान झोबंणाऱ्या गार वाऱ्यांनी अंगावर शहरे देखील आणले. कमाल तापमानात घट झाल्याने आज दिवसभार थंडी जाणवली.

राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी व कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.

शहरांचे किमान कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई 21 23.8

जळगाव 14 28

नाशिक 14.8 21.6

सातारा 13.6 26.8

सोलापूर 15.3 30.8

अकोला 15.7 30.4

अमरावती 14.3 29.2

बुलडाणा 14.3 28

गोंदिया 15.6 29.8

नागपूर 15.5 30

वाशिम 12 30

वर्धा 15.4 30

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT