mumbai sees highest jump covid cases since february maharashtra  corona fourth wave
mumbai sees highest jump covid cases since february maharashtra corona fourth wave  Sakal
मुंबई

मुंबईत 24 तासांत कोरोनाचे 102 नवे रुग्ण; फेब्रुवारीनंतर सर्वाधिक वाढ

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या भीतीदरम्यान मुंबईत मंगळवारी दोन महिन्यांत कोरोना रुग्ण संख्येत सर्वात मोठी वाढ पाहिला मिळाली. मुंबईत गेल्या 24 तासांत 102 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली असून, शहराच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रुग्णांची संख्या 10,59,433 झाली आहे. मुंबईत 102 नवीन कोविड प्रकरणांसह, शहरात 27 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णसंख्येत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

कोरोना मृत्यूची संख्या 19,562 इतकीच असून नवीन मृत्यूची नोंद झाली नाही. विशेष म्हणजे, मुंबईत गेल्या दोन दिवसांत दररोज कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. रविवारी मुंबईत 45 कोविड रुग्णांची नोंद झाली होती. या वर्षी 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत 103 कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली होती. त्यानंतर, शहरात 2 मार्चला 100 कोरोना रूग्णांची नोंद वगळता शहरातील नवीन रुग्णसंख्या दुहेरी अंकांमध्ये नोंदवली गेली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 153 नवीन रुग्ण आणि चार मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. दरम्यान, 153 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 943 झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT