Sanjay Raut Sanjay Raut
मुंबई

संजय राऊतांना कोर्टाचा दणका; वॉरंट धाडत हजर राहण्याचे आदेश

राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत सोमय्या यांच्या कुटुंबीयांवर आणि त्यांच्या सामाजिक संस्थेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नीने शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधातील दाखल केलेल्या मानाहानीचा (Defamation) दावा दाखल केला होता. या प्रकरणी कोर्टाने राऊतांना दणका दिला आहे. या प्रकरणी कोर्टाने राऊतांना यापूर्वी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु, राऊत हजर राहिले नव्हते. त्यानंतर आता शिवेरी कोर्टाने (Sewree Court) राऊतांना वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे राऊतांना मोठा दणका बसला असून या प्रकणावरील पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे. (Sanjay Raut Latest News In Marathi)

राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत सोमय्या यांच्या कुटुंबीयांवर आणि त्यांच्या सामाजिक संस्थेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मिरा-भाईंदर महापालिकेच्या क्षेत्रात टॉयलेट बांधणीच्या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यानंतर सोमय्या यांच्या पत्नी मेधा (Medha Somaiya) यांनी मुंबई उच्च न्यायालयात राऊत यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता.

सुमारे शंभर कोटींच्या कथित टॉयलेट गैरव्यवहाराच्या (Toilet Corruption) आरोपांविरोधात मेधा सोमय्या न्यायालयात गेल्या आहेत. या प्रकरणी कोर्टाने राऊत यांना कोर्टाना हजर राहण्याचे आदे दिले होते. परंतु, राऊत कोर्टात हजर न झाल्याने अखेर कोर्टाने राऊतांना वॉरंट बजावले असून, 18 जुलै रोजी या प्रकरणावरून पुढील सुनावणी पार पडणार आहे. आरोपांमुळे माझी आणि माझ्या कुटुंबीयांची प्रतिमा मलीन झाली आहे. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे राऊत यांनी आधारहिन आणि धादांत खोटे आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर खटल्याची कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांच्याकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT