मुंबई

मुंबईकर 7 तासांत पोहोचणार गजानन महाराजांच्या दर्शनाला! समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा-शेगाव दरम्यान चारपदरी महामार्ग

सकाळ डिजिटल टीम

Mumbai to Shegaon Road Construction : वीकेंड म्हटलं की मुंबईकरांची पावले वळतात ती पर्यटन स्थळांबरोबरच देवदर्शनाकडे. त्यानुसार त्यांच्यासमोर आतापर्यंत पर्यटनासाठी लोणावळा- खंडाळा आणि देवदर्शनासाठी शिर्डी, नाशिक, जेजूरी हीच जवळची ठिकाणे होती.

मात्र आता त्यांच्यासाठी गजानन महाराजांचे (शेगाव) दर्शनही आवाक्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गाला लागून सिंधखेडराजा- शेगाव असा तब्बल १०९ किलोमीटर लांबीचा चारपदरी महामार्ग उभारण्याच्या आराखड्याला मंजूरी दिली आहे.

त्यामुळे मुंबई-सिंदखेड राजा हा प्रवास पाच तासात तर तेथून पुढे शेगावचा प्रवास दोन तासात सहजपणे पूर्ण होऊ शकणार आहे. परिणामी भक्तांबरोबरच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहने ताशी १२० किलोमीटर वेगाने सुसाट धावत आहेत. पण समृद्धी मार्गावरील प्रवास संपल्यानंतर नाशिक, मनमाड, संभाजीनगर, बुलढाणा अशा विविध ठिकाणांहून पुढे जाताना बराचसा वेळ लागतो. त्याची दखल घेत एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गावर आठ ठिकाणी जोडमार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा येथून शेगावपर्यंत १०९ किमीचा चारपदरी ग्रीनफील्ड महामार्ग तयार करण्याची योजना असून त्याला राज्य सरकारनेही मंजूरी दिली आहे. त्यामुळे मुंबई-ठाणेकरांना कल्याणपासून पुढे सिंदखेडराजापर्यंत सुमारे ४१३ किलोमीटरच्या प्रवासाला चार-पाच तास लागणार आहेत, तर सिंदखेडराजापासून शेगावपर्यंत प्रशस्त महामार्ग होणार असल्याने सदरचा प्रवास आवध्या दोन तासात पूर्ण करता येणार असल्याची माहितील एमएसआरडीसीच्या अधिका-याने दिली.

जालना- नांदेड जोडमार्ग

एमएसआरडीसी समृद्धी महामार्गाला लागून जालना- नांदेड हा १७९ किलोमीटर लांबीचा सहा पदरी कनेक्टर उभारणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील वाहनधारकांनाही समृद्धी मार्गावरून प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT