mumbai sakal
मुंबई

Mumbai : शिंदे गटाच्या मेळाव्याच्या दिवशी मनसे आमदारांनी बॅनरबाजी

MIDC निवासी रस्त्यांची कुंडली "मुहूर्त नेमण्यासाठी जोतिषी नेमणे आहे"

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटीचा निधी मंजुर करण्यात आला असून त्यातील 48 कोटीच्या कामांची निवीदा एमएमआरडीएने जाहीर केली होती. या कामाची वर्क ऑर्डर निघून दोन महिने झाले अजून कामास सुरुवात झाली नसल्याने यावरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेला लक्ष केले आहे. शिंदे गटाचा डोंबिवलीत आज मेळावा असून त्याच पार्श्वभूमीवर रातोरात मनसेच्यावतीने शहरात बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर एमआयडीसीतील रस्त्यांची कुंडली मांडण्यात आली असून स्ते कामाचा मुहूर्त शोधण्यासाठी ज्योतिषी नेमणे आहे असे संदेश लिहून मनसेने शिवसेनेला डिवचले आहे.

पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील रस्ते खड्डे पडून खराब झाले आहेत. एमआयडीसीतील रस्त्यांची गेले अनेक वर्षे डागडुजी न केल्याने त्यांची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे. या रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटीचा निधी मंजुर करुन आणल्याची घोषणा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्याची मोठी बॅनरबाजी देखील झाली होती. निवासी भागातील रस्ते काम कोणी करायचे यावरुन एमआयडीसी व केडीएमसी यांच्याकडे पुरेसा निधी नसल्याने एकमत होत नव्हते. यावर 50 - 50 टक्के भागीदारीत काम करण्याचे ठरले आणि एमएमआरडीएने 48 कोटी कामांच्या निविदा देखील मंजुर केल्या. या सर्व कामाचे श्रेय शिवसेनेने घेतले मात्र कामास विलंब होत असल्याने मनसेने त्यांना लक्ष केले आहे. श्रेय घेण्याच्या नादात कामास दिरंगाई होत असल्याचे शिवसेनेच्या लक्षात येत नसल्याचे विधान आमदार पाटील यांनी याआधीच केले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाच्या मेळाव्या आधीच शहरात बॅनरबाजी करुन मनसेने शिवसेनेला डिवचले आहे.

रातोरात शहरात मनसेने बॅनर लावले आहेत. डोंबिवली मधील एमआयडीसी निवासी परिसरात वर्क ऑर्डर होऊन दोन महिने उलटले तरी रस्त्याची कामे सुरु झालेली नाहीत. "कोणी मुहूर्त देतं का मुहूर्त" आणि "मुहूर्त नेमण्यासाठी ज्योतिषी नेमणे आहे"अश्या आशयाचे बॅनर लावेल मनसे तर्फे लावण्यात आले आहेत. रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डरची कॉपी त्या बॅनवर झळकविली आहे. त्यामुळे या बॅनरची आता चर्चा होऊ लागली आहे.

याविषयी मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची 15 जुलै 2022 ला वर्क ऑर्डर निघाली आहे. ती ऑर्डर माझ्या हातात आहे, अजून का नाही त्याचे काम सुरु झाले. निवडणूकीच्या तोंडावर ही कामे सुरु करणार आहात का ? असा सवाल त्यांनी शिवसेनेला तसेच सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

रस्त्यांच्या कामावरुन शिवसेना, भाजपा, मनसे यांच्यात टोलवाटोलवी सुरु असतानाच मनसेचे हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आता याला शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाते हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Army Success Story: कोकणच्या लेकीची जगभर चर्चा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे ठरल्या अमेरिकन सैन्यातील पहिल्या मराठी महिला; महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण

Latest Marathi News Update : महावितरणला अदानी पॉवरकडून स्वस्त वीज खरेदीस मंजुरी; एक हजार सहाशे मेगावॉट पुरवठ्याला हिरवा कंदील

39व्या वर्षीही मेस्सीचा चमत्कार! विश्वचषकात असा विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फुटबॉलपटू, रोनाल्डोलाही जमलं नाही ते मेस्सीने केलं

Chhatrapati Sambhajinagar: जि.प.च्या नव्या इमारतीला लोकार्पणापूर्वीच गेले तडे; ठेकेदाराचे देयक रोखून दोषींवर कारवाईची मागणी

Srikant Shinde: हिंदुत्वाची विश्वासार्हता गमावली: देवदर्शनानंतर श्रीकांत शिंदेंचा राजकीय हल्लाबोल, खासदार ओमराजे निंबाळकरांसह शनिदर्शन

SCROLL FOR NEXT