Mumbai Slum sakal
मुंबई

Mumbai Slum Home : झोपडीवासियांना अडीच लाखांत घर; भाजप -उद्धव ठाकरे गटात श्रेयाचा वाद

मुंबईतील झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना अडीच लाखात घर देण्याची घोषणा करण्यात आली आहेत. या घोषणेचे लाखो झोपडीधारकांनी स्वागत केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना अडीच लाखात घर देण्याची घोषणा करण्यात आली आहेत. या घोषणेचे लाखो झोपडीधारकांनी स्वागत केले आहे. भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटात आता श्रेयवाद रंगला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2000 ते 2011 काळातील झोपडीवासियांना अडीच लाखांत घर देण्याच्या निर्णय जाहिर केला. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. शासन निर्णय जारी झाल्याने लाखो झोपडपट्टीवासियांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. त्याशिवाय या निर्णयामुळे झोपडपट्टी असलेल्या जागांचा विकास होणार आहे.

मात्र या निर्णयाचे पडसात झोपडपपट्टी भागात उमटत आहेत. श्रेय घेण्यासाठी भाजप ठाकरे गटात रंगला कलगीतुरा रंगला आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी या ऐतिहासिक निर्णयाबद्धल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले की, २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी सुधारित कायदा लागू केला होता. मात्र त्यानंतर हा नवा जीआर महाविकास आघाडी सरकारने लागू केला नाही. या संदर्भात आपण या प्रकरणी गेली अनेक वर्षे पाठपुरावा केला. केंद्रीय गृहनिर्माण मंत्री, एसआरए प्राधिकरणाकडे स्वतः आणि शिष्टमंडळासोबत आपल्या मागण्या आणि आपली मते मांडली. अखेर शासन निर्णय जारी केल्याने लाखो झोपडपट्टीवासियांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मात्र ठाकरे गटाचे शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले की, 2000 ते 2011 काळातील झोपडीवासियांना अडीच लाखांत घर देण्याचा शासन निर्णय हे शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे यश आहे. मुंबईतील नाले व रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेल्या अनेक झोपड्या या 2000 ते 2011 काळातील आहेत. त्यांचे सुशुल्क पुनर्वसन करायचे ठरले तर लवकर सुशुल्क धोरण निश्चित केले पाहिजे यासाठी मी विधानसभेत लक्षवेधी मांडली. त्यामुळे सरकारने शासन निर्णय जारी केला. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटात श्रेयवादाची लढाई सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT