ST BUS  Sakal
मुंबई

Mumbai S.T Bus : आयुर्मान संपलेल्या बसचा सर्रास वापर

अनेक वर्षांपासून एसटी बसची पीयूसी काढली जात नसल्याचेही समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आठ वर्षे आयुर्मान असलेली वाहनेच मुंबईत चालवणे अनिवार्य आहे; मात्र एसटी महामंडळातील आठ वर्षांपेक्षा अधिक वर्षे झालेल्या तसेच डिझेलवर धावणाऱ्या बस मुंबईत धावत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी बसची पीयूसी काढली जात नसल्याचेही समोर आले आहे.

वाहनाचे आयुर्मान आठ वर्षांपेक्षा जास्त असल्यास ते वाहन मुंबईत चालवता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

वायुप्रदूषणावर रोख लावण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण, सीएनजी पीएनजीवर धावणाऱ्या बसेस, वाहन खरेदीला अधिक प्रोत्साहन दिले आहे.

भविष्यात पेट्रोल, डिझेल इंधनावर धावणाऱ्या वाहनांची संख्या कमी करण्याचे केंद्राचे धोरण आहे; मात्र त्यानंतरही सध्या इंधनावर धावणाऱ्या वाहनांकडून मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे.

एसटी महामंडळातील सर्वाधिक बसेसचे आयुर्मान आठ वर्षांपेक्षा जास्त झालेले आहे. शिवाय अत्यंत वाईट पद्धतीने या बसेसची देखभाल-दुरुस्ती केली जाते. आयुर्मान होण्यापूर्वी त्या बसेस खिळखिळ्यासुद्धा झाल्या आहेत.

त्यामुळे डिझेलवर धावणाऱ्या बसेस सर्वाधिक काळा धूर रस्त्यावर सोडत असल्याचे दिसते. यापूर्वी एसटी महामंडळाची पीयूसी काढली जात होती; मात्र आता गेल्या अनेक वर्षांपासून बसेसची पीयूसी काढली जात नसल्याने अधिक वायुप्रदूषण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्याकांत प्रकरणात सियाच्या दोन मैत्रीणींकडेही चौकशी होणार

सरकारी रुग्णालयात प्रसुती झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

TrashBot : बारावीच्या विद्यार्थिनीने बनवला अद्भुत 'ट्रॅशबॉट' रोबो; कचरा बघताच पळत जाऊन करतोय साफसफाई, पाहून तुमचं डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT