Mumbai crime
Mumbai crime 
मुंबई

Mumbai : भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक! घटना सीसीटीव्हीत कैद

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - भाजपाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्षांच्या जनसंपर्क कार्यालयावर भर दुपारी दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात संदीप सिंह यांचे भाजपा जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयावर अज्ञात तरुणांकडून दगडफेक करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्या आधारे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस तरुणांचा शोध घेत आहेत.

गुरुवारी दुपारच्या सुमारास काही अज्ञात तरुणांकडून भाजपा जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. सुदैवाने यावेळी कार्यालया बाहेर कोणी कार्यकर्ता नव्हता. अचानक दगडफेक झाल्याने कोणाचं काही समजले नाही. काही समजायच्या आत हलखोरांनी तेथून पळ काढला होता. ( Latest Marathi News)

या दगडफेकी च्या घटनेत कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. दगडफेक करणारे तरुण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत. याबाबत बोलताना संदीप सिंग यांनी या आधी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. त्याकडे मी दुर्लक्ष केलं. मात्र काल पुन्हा दगडफेकीचा प्रकार घडला याबाबत मी महात्मा फुले पोलिसांना तक्रार देणार असल्याचे सांगितले. तर महात्मा फुले चौक पोलिसांनी देखील घटनेचा तपास सुरू केला आहे. (Breaking Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT