Mumbai Sakal
मुंबई

Mumbai: भटक्या श्वानांचा 5 जणांना चावा; कल्याण पश्चिमेत भटक्या श्वानांची दहशत

कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सनराईस गॅलेक्सी सोसायटीमधील 5 जण भटक्या श्वानांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण पश्चिमेत एका सोसायटी मधील 5 जणांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याची घटना घडली आहे. सनराईस गॅलेक्सी सोसायटीतील नागरिकांसोबत हा प्रकार घडला असून रस्त्याने पायी चालत जाण्याची भिती येथील नागरिकांना वाटू लागली आहे.

पालिका प्रशासनाने भटक्या श्वाननांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रहिवाशांनी केली असून यासंबंधी पालिका आयुक्त डॉ. दांगडे यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सनराईस गॅलेक्सी सोसायटीमधील 5 जण भटक्या श्वानांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे.

आठवड्याभराच्या कालावधीत सोसायटीमधील 5 व्यक्तींना या श्वानांनी चावा घेतला आहे. यामध्ये 3 शाळकरी विद्यार्थी व इतर दोन प्रौढ व्यक्ती असल्याचे सोसायटी मध्ये राहणारे निलेश रुद्राक्ष यांनी सांगितले. अजय गायकवाड, अर्णव अजय गायकवाड, झेबा रईस खान, दक्ष वर्मा अशी जखमी झालेल्या रहिवाशांची नावे आहेत.

येजा करणाऱ्या नागरिकांवर अचानक हे श्वान हल्ले करत असून या घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाल्या आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून येथून ये जा करताना जीव मुठित धरुनच नागरिक प्रवास करत आहेत.

या प्रकारानंतर सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना पत्रव्यवहार करुन तातडीने यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. पालिका प्रशासनाने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील रहिवाशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMO and Raj Bhavan renamed : मोदी सरकारचा मोठा निर्णय! ‘पीएमओ’ अन् ‘राजभवन’ नावात केला बदल

Pune News : ‘बदनामी करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कारवाई करावी’; सूत्रधाराचाही शोध घेणार- आमदार चित्रा वाघ

Beed Crime: गेवराईत राडा! अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकरांवर हल्ला

Video : भल्यामोठ्या नंदीवर बसून प्राजक्ता-शंभूराजची रिसेप्शनला ग्रँड एंट्री ! थाटात झालं स्वागत

Latest Marathi News Live Update : ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT