Mumbai: रक्षाबंधनसाठी नणंदेकडे आलेल्या विवाहितेची आत्महत्या, डोंबिवलीतील घटणा Sakal
मुंबई

Mumbai: रक्षाबंधनसाठी नणंदेकडे आलेल्या विवाहितेची आत्महत्या, डोंबिवलीतील घटणा

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली - रक्षाबंधनसाठी जळगाव हून डोंबिवली मध्ये आपल्या नणंदेकडे आलेल्या एका विवाहितेने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी आजदे पाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून पूजा सोळंके (वय 20) असे मृत महिलेचे नाव आहे.

डोंबिवली मधील आजदे पाडा परिसरात सकाळच्या सुमारास पूजा हिने जय गुरुदेव इमारतीच्या चौथ्या मजल्यावर उडी मारून जीवन संपवलं आहे.

पूजा हिचे 8 महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. रक्षाबंधनसाठी ती जळगाव येथील भिलवडी मुक्ताईनगर हून डोंबिवली मध्ये आपल्या नणंदेच्या घरी आली होती.

दरम्यान तीचा पतीसोबत काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर पूजाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT