fine
fine sakal
मुंबई

पाच रुपयांचा मोह स्टॉल चालकाला पडला महागात; रेल्वेने ठोठावला ५० हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर खाद्यपदार्थ स्टॉलधारकाला रेलनीरच्या पाण्याची बॉटल विकताना प्रवाशांकडून जादा पैसे घेणे चांगलेच महागात पडले आहे.

मुंबई - मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर खाद्यपदार्थ स्टॉलधारकाला रेलनीरच्या पाण्याची बॉटल विकताना प्रवाशांकडून जादा पैसे घेणे चांगलेच महागात पडले आहे. रेलनीर पाण्याच्या बाटल १५ रुपयांऐवजी २० रुपये ग्राहकांकडून आकारत असल्याने मध्य रेल्वेने स्टॉलधारकावर कारवाई करत ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मुंबईत दररोज उपनगरीय लोकल सेवामधून ७५ लाख तर लांब पल्य्याच्या गाड्यांने सुद्धा लाखो प्रवासी प्रवास करत असल्यामुळे सर्वाधिक व्यस्थ विभागा मध्ये मुंबईच्या समावेश होते. या प्रचंड संख्येच्या रेल्वेप्रवाशांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी रेल्वेने पाणपोयांची सोय असली तरी अनेक स्थानकांत त्या बंद पडलेल्या आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्थानकांमध्ये बाटली बंद रेलनीर पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना इतर कंपन्याचे बाटली बंद पाणी जादा पैसे मोजून घ्यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यांच्या फायदा घेत काही रेल्वे स्थानकांवरील स्टॉलधारकाकडून रेलनीरच्या पाण्याची बॉटल १५ रुपयांऐवजी सर्रासपणे २० रुपये किंमती विक्री करून प्रवाशांची लूट केली जात आहे.

नुकताच लोकमान्य टिळक टर्मिनसवरील खाद्यपदार्थ स्टॉलधारकाकडून एका प्रवाशांची लूट करत असल्याची प्रकार एका रेल्वे प्रवाशाने व्हिडीओ शूट करत समोर आणला आहे. हा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने स्टॉलधारकावर कठोर कारवाई केली आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, लोकमान्य टिळक टर्मिनस येथील स्टॉल मालकाने रेलनीरच्या पाण्याची बॉटल  १५ रुपयांऐवजी २० रुपयांना विकली या प्रकरणी स्टॉल मालकाला ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT