jail file photo
मुंबई

मुंबई: अवघ्या दोन मिनिटांच्या किडनॅपिंगसाठी सहा महिने तुरुंगवास

त्याने मुलीच अपहरण केलं आणि तितक्यात...

दीनानाथ परब

अवघ्या दोन ते तीन मिनिटांसाठी झालेल्या अपहरणाच्या एका गुन्ह्यात आरोपीला सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अपहरण केल्यानंतर अवघ्या दोन ते तीन मिनिटात मुलीच्या वडिलांनी आरोपीला पकडले. ते घराजवळ बाईक पार्क करत असताना, मुलगी गेट जवळ थांबली होती. सलग २० दिवसाच्या सुनावणीनंतर मुंबईतील सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये ही घटना घडली होती.

मुलगी एकटीच उभी होती. तिला कुठली भीती वाटू नये, या भावनेतून मी तिला उचलून घेतले असा आरोपीने दावा केला. न्यायालयाने मुलीची साक्ष ग्राहय धरुन आरोपीचा दावा फेटाळून लावला. आरोपी मुलीला उचलून घेऊन निघाला, तेव्हा त्याने तिला काहीही विचारले नव्हते. कोर्टाने सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली असली, तरी सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यास नकार दिला.

मुलीचे अपहरण करण्याच्या उद्देशाने आरोपी घटनास्थळी आला नव्हता, हे आरोपीचे म्हणणे कोर्टाने मान्य केले. पण मुलीला एकटे पाहून त्याने तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. "कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही. आरोपीची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि तो कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याने एक हजार रुपये दंड व सहा महिन्याची शिक्षा पुरेशी आहे" असे कोर्टाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT