Mumbai University
Mumbai University Sakal media
मुंबई

१५ मार्च रोजी मुंबई विद्यापीठाची सिनेट; चहापानावर सदस्यांचा बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाची (Mumbai university) अधिसभा १५ मार्च रोजी होणार आहे. त्यानिमित्त आज विद्यापीठ प्रशासनाकडून सिनेट सदस्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने (online) आयोजित करण्यात आला होता. त्यावर युवासेनेच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अधिसभेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने चहापानाचा कार्यक्रम (Tea Party Boycott) ठेवण्यात आल्याने त्यावर बहिष्कार टाकल्याची माहिती युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. तसेच अधिसभाही ऑनलाईन घेतली जाण्याची शक्यता असल्याने सिनेट सदस्यांनी (Senate member) आक्षेप नोंदवले आहेत.

राज्यात आणि देशात सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ यांचा कारभार ही सुरळीत सुरू असताना विद्यापीठाने सिनेट सदस्यासाठी चहापानाचा कार्यक्रम ऑनलाईन ठेऊन सदस्यांची प्रशासनाने एक प्रकारची थट्टा केल्याचा आरोप सदस्यांकडून केला जात आहे. यावेळी अधिसभा विविध प्रश्नांवर गाजण्याची शक्यता असल्याने तीसुद्धा ऑनलाईन घेऊन विद्यापीठ प्रशासन बचावात्मक भूमिका घेत असल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात आला.

अधिसभेत गाजणारे विषय

मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा मुद्दा अद्यापही अधांतरी राहिला असल्याने या एकाच विषयावर युवासेनेचे सिनेट सदस्य कुलगुरूंना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. सुमारे साडेतीन एकर जागेवर झालेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी पाठपुरावा करण्यास होत असलेली दिरंगाई हा विषयही अधिसभेत गाजण्याची शक्यता असल्याने विद्यापीठाकडून अधिसभा ऑनलाईन आयोजित केली जाण्याची शक्यता सिनेट सदस्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT