dalai lama sakal
मुंबई

Dalai Lama : दलाई लामांची बदनामी करण्यात आली; तो व्हायरल व्हिडीओ खोटा

सोशल मिडीयावर फिरत असलेल्या दलाई लामा यांच्या वादग्रस्त व्हिडिओच्या विरोधात शुक्रवारी (ता.२१) रोजी मुंबईच्या आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

सोशल मिडीयावर फिरत असलेल्या दलाई लामा यांच्या वादग्रस्त व्हिडिओच्या विरोधात शुक्रवारी (ता.२१) रोजी मुंबईच्या आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली.

मुंबई - सोशल मिडीयावर फिरत असलेल्या दलाई लामा यांच्या वादग्रस्त व्हिडिओच्या विरोधात शुक्रवारी (ता.२१) रोजी मुंबईच्या आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली. ६०० तिबेटियन नागरिकांनी यात सहभाग नोंदविला होता. पुणे, नाशिक, वडोदरा आणि आजूबाजूच्या सर्व तिबेटियन, फ्रेंड्स ऑफ तिबेटियन, इंडियन बुद्धिस्ट असोसिएशनचे सभासद आणि दलाई लामा यांचे अनुयायी या निदर्शनात सहभागी झाले होते.

आंदोलक तेन्झिन मेथोक यांनी सांगितले, आम्ही आमच्या गुरूंच्या सन्मानासाठी एकत्र आलो आहोत. दलाई लामा त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहे. आमच्या गुरूंनी लहान मुलांसोबत चुकीचे कृत्य केले असे माध्यमे ओरडून सांगत आहेत. ते चुकीचे आहे आम्ही खरा व्हिडीओ समोर आणला आहे. जो व्हिडीओ व्हायरल झाला तो खोटा आहे. हा व्हिडीओ संपादित करून मोडतोड करून बनवला आहे. खरा व्हिडीओ आमच्याकडे आहे तो आम्ही इथे दिला आहे. हा खोटा कोणी व्हायरल केला. माध्यमांनी कोणतीही शहानिशा न करता तो कसा चालविला याची भारत सरकारने चौकशी करावी.

हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या माध्यमांनी आणि सोशलमिडीया ऍक्टिव्हिस्टने गुरु दलाई लामा यांची क्षमा मागावी. आमच्या गुरूंनी नेहमी शांतीचा संदेश दिला आहे. इतकी वर्ष जगभरात त्यांनी दया, शांती आणि क्षमा ही मूल्ये पेरली. हा देश गांधीजींची तत्वे मानणारा आहे. मात्र इथे आमच्या गुरूंची बदनामी केली जाते आहे. आम्ही आज देशभरात नव्हे तर जगभरात निदर्शने करत आहोत. भारत सरकारने याची दखल घ्यावी, या आग्रही मागणीसाठी आम्ही निदर्शने करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT