corona sakal
मुंबई

मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 6 टक्क्यांवर; अलर्ट राहण्याच्या सूचना

सर्वाधिक म्हणजे 2526 रुग्ण हे मुंबईमध्ये असून, या खालोखाल ठाण्यामध्ये 413 कोरोनाचे सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने प्रशासन आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु, काल राज्यात नव्या 711 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्याशिवाय मुंबईतदेखील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून, येथील रूग्ण बाधित होण्याचा दर 6 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे काहिशी चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुंबईतील वाढता पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेता कोविड चाचण्या करण्याला गती दिली जाईल, असे मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतर शहरातील लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या चाचण्या युद्धपातळीवर वाढवण्याच्या सूचनांसह प्रयोगशाळा सुसज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या सूचना काय

  • वाढत्या पॉझिटिव्हिटी रेटनंतर मुंबईतील कोरोना चाचण्यांची संख्या युद्धपातळीवर वाढवण्यात येणार आहे. तसेच टेस्टिंग लॅब आणि कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • १२ ते १८ वयोगटातील लसीकरण वाढवावे, तसेच बुस्टर डोसची संख्याही वाढवावी.

  • जंबो कोविड सेंटर पुन्हा सज्ज करावेत. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अलर्ट करावेत.

राज्यात 711 नव्या कोरोना बाधितांची नोंद

गेल्या 24 तासात समोर आली असून, राज्यात 24 तासात 711 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या 24 तासामध्ये एकूण 366 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, राज्यात आज एकूण 3475 इतक्या सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 2526 रुग्ण हे मुंबईमध्ये असून, या खालोखाल ठाण्यामध्ये 413 कोरोनाचे सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना गेल्या 24 तासाच राज्यात केवळ एका कोरोना बाधिताच्या मृत्युची नोंद करण्यात आली असून, राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 77,35, 751 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्क्यांवर नोंदवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT