Mumbai Water Taxi  sakal
मुंबई

Mumbai Water Taxi : वॉटर टॅक्सी नफा -तोट्याचा विचार करूनच सुरु करणार; बेस्ट प्रशासनाची भुमिका

गेट वे ते बेलापूर, उरण, जेएनपीटी दरम्यान बेस्ट उपक्रमचा वॉटर टॅक्सी उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे. नफा तोट्याचा विचार करूनच ही सेवा सुरू केली जाईल.

सकाळ वृत्तसेवा

गेट वे ते बेलापूर, उरण, जेएनपीटी दरम्यान बेस्ट उपक्रमचा वॉटर टॅक्सी उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे. नफा तोट्याचा विचार करूनच ही सेवा सुरू केली जाईल.

मुंबई - गेट वे ते बेलापूर, उरण, जेएनपीटी दरम्यान बेस्ट उपक्रमचा वॉटर टॅक्सी उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे. नफा तोट्याचा विचार करूनच ही सेवा सुरू केली जाईल. मात्र या सेवेमुळे जलद प्रवास व वेळेची बचत होईल अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

एक ते दीड कोटींची वॉटर बोट त्यात १० ते १२ प्रवाशांची क्षमता आहे. मात्र वॉटर बोटचे तिकीट दर प्रवाशांच्या खिशाला परवडणारे नसतील त्यामुळे बेस्टला तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे विचार करूनच ही सेवा सुरू केली जाईल असे प्रशासनाचे मत आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रवाशांना मुंबई बाहेर जाण्यासाठी प्रवासी साधन म्हणून वॉटर टॅक्सी ( बोट ) सुरु करण्याबाबत हालचाली सुरु आहेत. बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून मार्वे मनोरी दरम्यान १९९० मध्ये वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध केली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे ही सेवा भविष्यात सुरु ठेवणे शक्य झाले नाही.

परंतु वॉटर टॅक्सी चालवण्याचा बेस्ट उपक्रमाचा अनुभव लक्षात घेता गेट वे ते बेलापूर - उरण - जेएनपीटी दरम्यान वॉटर टॅक्सी सुरु करण्यात कुठलीही अडचण येणार नाही, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात येत आहे. मात्र एका वॉटर बोटची किंमत एक ते दीड कोटी रुपये आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर चालवणे तसेच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिट दर खिशाला परवडणारा हवा, तरचं वॉटर टॅक्सी संकल्पना यशस्वी होईल. त्यामुळे तिकिट दर काय असेल याबाबत चर्चा सुरु असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

तोट्यात जाऊन सुरु करणे अशक्य

बेस्ट उपक्रम आधीच तोट्यात आहे. त्यामुळे वॉटर टॅक्सी सुरु केल्यानंतर आणखी तोटा होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या शिपिंग मिनिस्ट्री, मुंबई पोर्ट ट्रस्ट मेरी टाईम बोर्ड यांच्या बरोबर चर्चा सुरु आहे,

- लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT