Mumbai Sakal
मुंबई

Mumbai: झाडाची फांदी काढण्याचे काम सुरू असतानाच, वेगाने आलेला टेम्पो थेट जेसीबीला धडकला

...परिणामी सुभाष नगरकडून लालचौकीकडे येणारा मार्ग बंद ठेवण्यात आला होता.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीला एका टेम्पोने जोरदार धडक दिल्याची घटना सकाळी घडली. झाडाची तुटलेली फांदी बाजूला करण्याचे काम जेसीबी व काही कर्मचारी करत होते याचदरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातात काही नागरिक थोडक्यात वाचले असून टेम्पोचालक किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

कल्याण पश्चिमेच्या वासुदेव बळवंत फडके मैदानासमोरील सुभाष नगर येथे आज सकाळी झाडाची भलीमोठी फांदी तुटून रस्त्यावर पडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी रस्ता मात्र बंद झाला.

तर रस्त्यावर पडलेली ही भलीमोठी फांदी जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते. परिणामी सुभाष नगरकडून लालचौकीकडे येणारा मार्ग बंद ठेवण्यात आला होता.

दरम्यान ही फांदी जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने बाजूला केली जात असताना एक टेम्पो त्याच मार्गावरून लालचौकीकडे भरधाव वेगाने येत होता.

आणि जेसीबीचालक आणि त्या शेजारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही समजायच्या आतच या टेम्पोने जेसीबीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की हा जेसीबी तब्बल दीड ते दोन फूट पुढे ढकलला गेला.

जेसीबीचा मागचा पंजा टेम्पोची पुढची काच तोडून थेट टेम्पोच्या केबिनमध्ये घुसला. ज्यामध्ये हा टेम्पो चालक त्यात अडकून पडला. या टेम्पोमध्ये आणखी कोणी होते की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.

तर टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांना मोठे प्रयत्न करावे लागले. टेम्पोचालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याचा आरोप यावेळी काही नागरिकांकडून करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

Vilas Chavan Success Story : दगड फोडणाऱ्या हातांनी घडवला 'साहेब'; मजुराचा मुलगा बनला अधिकारी, विलास चव्हाणांची MIDC अभियंता पदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा

Konkan Holi Festival : एकमेकांच्या अंगावर फेकली जातात जळती लाकडे, होळीला रंगते देव-दानव युद्ध ! कोकणातील 'या' गावात शेकडो वर्षांची परंपरा

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

SCROLL FOR NEXT