मद्य विक्रेते व्हिस्की स्कॉचच्या नवीन दराचा प्रतीक्षेत Sakal
मुंबई

मुंबई : मद्य विक्रेते व्हिस्की स्कॉचच्या नवीन दराचा प्रतीक्षेत

उत्पादन शुल्क कपातीमुळे दर कमी होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क 50 टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने नववर्षापूर्वीच व्हिस्की स्कॉचचे दर घसरणार आहेत. 300 वरून तब्बल 150 टक्के उत्पादन शुल्क कपात झाल्याने दर सुद्धा घटणार आहे. मात्र, अद्याप उत्पादन कंपन्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला आपले दर सादर केले नसल्याने मद्य विक्रीचे दर जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये अद्याप संभ्रम आहे.

ब्लॅक डॉग, टीचर्स, जॉनी वॉकर, ब्लॅक लेबल, शीवास रिगल अशा लोकप्रिय विदेशी ब्रँडची सध्यातरी राज्यात खप होत नाही. हे महागडे मद्य पिणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे क्वचित ठिकाणी हे ब्रँड राज्यातील बार किंवा शॉप मध्ये आढळून येतात. मात्र, आता उत्पादन शुल्काच्या कपातीनंतर दरांमध्ये घट झाल्याने या बँडच्या किमती घटणार आहे. त्यामुळे छोटे दुकानदार व्यावसायिक सुद्धा हे महागडे ब्रँड विक्रीस ठेवता येणार असल्याचे दुकान मालक प्रदीप शेट्टी यांनी सांगितले.

नववर्षांपूर्वीच जर व्हिस्की स्कॉच चे दर घेतल्यास तळीरामांचे नववर्ष आणखी उत्साहात साजरा होणार आहे. शिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल सुद्धा वाढण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे. सध्या इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक व्हिस्की स्कॉचचे दर आहे.

राज्य - लोकप्रिय ब्रॅण्डची 750 मिलीची किंमत (रू.)

महाराष्ट्र - 5,760

चंदीगढ - 2,200

दिल्ली - 2,800

प. बंगाल - 3,500

गोवा - 2,800

दमण व दिव - 3,000

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT