murder case murder case
मुंबई

कुटुंबापासून मुक्ती मिळविण्यासाठी मुलानेच रचली खुनाची खोटी कहाणी

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील फ्लॅटमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : सुमारे दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील फ्लॅटमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला (Father and mother killed) होता. फ्लॅटमध्ये त्याची पत्नी जखमी अवस्थेत आढळून आली होती. या घटनेला तब्बल १४ दिवस उलटून गेल्यानंतर पोलिसांनी रक्तरंजित खेळातील आरोपी मुलाला (Murder )अटक केली आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रमोद बनेरिया असे मृताचे नाव आहे. १० डिसेंबर रोजी त्यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळला होता. प्रमोद हे रेल्वेतून मोटरमन पदावरून निवृत्त झाले होते. पत्नी कुसुम (५२) या घराच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात जखमी पडल्या होत्या. दाम्पत्याचा मुलगा लोकेशने चौकीदाराला निरोप पाठवून रुग्णवाहिका बोलावली होती. चौकीदाराने शेजाऱ्यांना सांगितल्यानंतर फ्लॅटमध्ये पोहोचले. त्यावेळी लोकेश आणि त्याची आई जखमी अवस्थेत दिसले. दोघांनाही रुग्णालयात दाखल केल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.

वडिलांनी मला आणि आईला चाकूने भोसकले (Murder). यानंतर वडिलांनी आत्महत्या केली, असे लोकेशने पोलिसांना सांगितले. लोकेशच्या या वक्तव्यावर पोलिसांना संशय आला होता. मात्र, त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते. यामुळे पोलिसांनी तपास सुरू ठेवला होता. उपचारादरम्यान लोकेशची आई कुसुम यांनी सांगितले की, मुलाने तिच्यावर आणि पतीवर चाकूने हल्ला केला होता. यानंतर कुसुम यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुसुम यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून लोकेशला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर अटक (son arrested) केली.

लोकेशला कुटुंबापासून मुक्ती मिळवायची होती

प्राथमिक तपासात लोकेशच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याचे समोर आले. दारूच्या नशेत ते अनेकदा पत्नीला मारहाण करीत होते. यामुळे लोकेश चांगलाच अस्वस्थ झाला होता. लोकेशला कुटुंबापासून मुक्ती मिळवायची होती. यामुळेच त्याने आई-वडिलांवर हल्ला केला होता २७ वर्षीय लोकेशला अटक (son arrested) केल्यानंतर स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT