Anil Parab  Sakal
मुंबई

MVA Meeting: "सभा उधळवणाऱ्यांनी यावंच"; मविआच्या नेत्यांचं शिरसाटांना आव्हान

एक मे रोजी मविआची वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसीत पार पडणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाविकास आघाडीची १ मे रोजी मुंबईतील बीकेसीत वज्रमुठ सभा होणार आहे. या सभेच्या तयारीबाबत आज मविआची बैठक मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीच्या तपशीलाबाबत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माहिती दिली. यावेळी सभा उधळण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांना त्यांनी आव्हान दिलं आहे. ज्यांना सभा उधळवायची आहे त्यांनी यावं, असं त्यांनी म्हटलं आहे. (MVA Meeting Leaders of MVA Anil Parab challenge Sanjay Shirsata)

परब म्हणाले, मुंबईत १ मे रोजी जी मविआची सभा होणार आहे, त्याबाबत आजची बैठक पार पडली. वज्रमुठ ही सभा न भुतो न भविष्यतो व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. याबाबत आमची पोलीस आयुक्तांशी बैठक झाली, त्यांच्या सूचना, परवानग्या आम्ही घेतल्या आहेत. सभेसाठी अंतिम परवानगी लवकरच मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.मविआच्या वज्रमूठ सभेत प्रत्येक पक्षाचे दोन नेते संबोधित करतील, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

ज्यांना सभा उधळवायची त्यांनी यावं - परब

दरम्यान, मविआची सभा उधळवण्याची भाषा करणाऱ्यांना आमचं आव्हान आहे असं सांगताना ज्यांना सभा उधळवायची आहे, त्यांनी यावं. आम्ही आव्हान देत देतच सभा घेतल्या आहेत, असं आव्हान परब यांनी गुलाबराव पाटील यांना दिलं आहे. आम्हाला सभा यशस्वी करायची आहे, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे, असं परब यावेळी म्हणाले.

दगड मारुन सभा उधळवणारे आम्ही

दरम्यान, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, "राऊतांनी आम्हाला सभांबाबतच्या आयडिया शिकवू नयेत. राऊत कोणत्याच आंदोलनात नव्हते त्यांना शिवसेनेचं आंदोलन कसं कराव हे ही माहिती नाही. दगडं मारुन लोकांच्या सभा बंद करणारे लोक आहोत आम्ही त्यामुळं त्यांनी आम्हाला चॅलेंज करु नये"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT