thief arrested
thief arrested sakal media
मुंबई

नालासोपारा : पार्किंग मधील चारचाकी वाहन चोरणारी टोळी अटकेत

विजय गायकवाड

नालासोपारा : महामार्गावरील हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणी पार्किंगमध्ये (Public parking) उभी केलेली वाहनाचे लॉक तोडून फरार होणा-या टोळीचा पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (Police special unit) भांडाफोड केला आहे. यात टोळीतील 2 जणांना अटक केले (culprit arrested) असून त्यांच्याकडून 2 लाख 96 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Property seized) केला आहे. या टोळीने आणखी किती ठिकाणी चो-या केल्या आहेत याचा तपास सुरू असल्याची माहिती पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले (Vilas chaughule) यांनी दिली आहे.

सरवर फत्तेह मोहम्मद खान आणि वासिफ साबीर आली असे अटक चोरट्याची नाव आहेत. चारचाकी वाहनांच्या चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी वरिष्ठ च्या मार्गदर्शन खाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी महेंद्र शेलार यांचे एक स्वतंत्र पथक निर्माण केले होते. तांत्रिक बाबी आणि गुप्त बातमीदार यांच्या माहिती वरून तपास करीत असताना यातील सरवर खान या आरोपीला प्रथम ताब्यात घेतले.

त्यानंतर उत्तरप्रदेश प्रतापगड येथून दुसरा आरोपी वासिफ अली याला ताब्यात घेतले, दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी एक बोलेरो कार, स्विफ्ट कार अशा दोन कार चोरल्याची कबुली दिली आहे. तसेच या चोरट्या वर मुंबई शहर, उत्तरप्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी ही वाहन चोरीचे गुन्हे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT