मुंबई

'दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणार नाही'; नाना पटोलेंनी सरकारला फटकारले

तुषार सोनवणे

मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. परंतु अधिवेशन दोनच दिवसांचे असल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणार नाही अशाने जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळणार नाही. या शब्दात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

कोरोना काळानंतर राज्यात अनेक प्रश्न आहेत. आमदारांचे अधिकार आणि जनतेचे प्रश्न सभागृहातच मांडता येतात. म्हणून सरकारने विरोध पक्षासोबत बसून सोशल डिस्टंन्सिंगची नियमावली तयार करावी. दोन दिवसांचा वेळ विधिमंडळ कामासाठा अपुरा आहे. असे मत नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या सुरवात करताना मांडले.

शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या रवि राणा यांना पोलिसांनी तुरूंगात डांबले होते. त्यांना दिवाळीत तुरूंगात रहावे लागले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली. आमदार रवि राणा यांनी सरकारविरोधी फलक सभागृहात झळकावले. त्यांच्या कृतीवर आक्षेप नोंदवत नाना पटोले यांनी अशा प्रकारचे फलक घेऊन येणाऱ्यांना सभागृहात न सोडण्याच्या सुचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT