narayan rane sakal
मुंबई

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आजपासून राणेंची जनआशीर्वाद यात्रा

सकाळ वृत्तसेवा

बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर जाणार; वातावरणात तापण्याची चिन्हे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात आजपासून (ता. १९) शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देवून करत भाजपने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा इशारा दिल्याने उद्या दादर येथे वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय मंत्र्यांचा दौरा असल्याने शिवाजी पार्क पोलिस ठाण्याने सुरक्षेची व्यवस्था केली आहे.

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले नसल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच अभिनंदन करायला मन मोठं लागतं असा टोलाही हाणला होता.या पार्श्वभूमीवर नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देत आहेत. महापालिका निवडणुकीची सूत्रे नारायण राणे यांच्याकडे सोपवल्याने या यात्रेला विशेष महत्त्व आले आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, जन-आशीर्वाद यात्रेमुळे मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी नक्कीच ताकद मिळेल.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. थोर पुरुषांच्या दर्शनासाठी अटकाव घालणे म्हणजे कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन आहे. आमच्या दौऱ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करणे हा कार्यक्रम असून तो शांतपणे पार पाडणार आहोत. त्यांच्या हाताखाली तयार झालेला कार्यकर्ता आज केंद्रात मंत्री आहे. आज जर बाळासाहेब हयात असते तर हे पाहून त्यांनाही नक्कीच आनंद झाला असता. छोट्या मनोवृत्तीचे नेते अशा थोर नेतृत्वाचे दर्शन घेत असताना विरोध करू शकत नाहीत, असेही दरेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT