Kishori-Pednekar-Narayan-Rane 
मुंबई

"ही जन आशीर्वाद यात्रा नसून..."; महापौरांचे राणेंना प्रत्युत्तर

विराज भागवत

नारायण राणेंनी मुंबई पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर केली होती टीका

मुंबई: भाजपचे नवे केंद्रीय मंत्री सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात ठिकठिकाणी या मंत्र्यांच्या रॅली आयोजित करण्यात आल्या आहेत. आज मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीदरम्यान राणे यांनी मुंबई पालिकेवर सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेने मुंबईकरांसाठी काहीही केलेलं नाही. त्यांनी फक्त मुंबईची वाट लावली अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. याच वक्तव्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले.

"भाजपने सध्या काढलेली यात्रा ही जन आशीर्वाद यात्रा नसून ही जन छळवणूक यात्रा आहे. राजकीय हव्यासापोटी ही यात्रा काढण्यात आली आहे. मुंबईत जर सत्ताधाऱ्यांनी काहीच केलेलं नसेल तर कोरोना संकटकाळानंतरही मुंबई अजूनही नंबर वन कशी आली? कोरोनाची तिसरी लाट येणार असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. अशा वेळी आपण हळूहळू अनलॉककडे जात असताना हजारो लोकांनी एकत्र येणं म्हणजे एका अर्थी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासारखे आहे", अशी टीका महापौर पेडणेकर यांनी केली.

"तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणं म्हणजे जन आशीर्वाद यात्रा आहे. ही यात्रा म्हणजे समजूतदारपणा नाही. केंद्रात सोडवण्यासारखे खूप प्रश्न आहेत. अशा वेळी केवळ मुंबई पालिकेसाठी हजारोंची गर्दी करणं चुकीचं आहे. जर मुंबईत शिवसेनेने काहीच केलं नाही असं काही लोक म्हणत असतील तर जगाने आणि देशाने मुंबई मॉडेलचं कौतुक कसं काय केलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रियतेच्या यादीत टॉप ५ मध्ये कसे काय आले? या साऱ्याची भाजपने उत्तरे द्यावीत", असे रोखठोक वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केले.

राणे काय म्हणाले?

आजही बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. म्हणूनच मुंबई महापालिका जिंकणं ही माझी जबाबदारी आहे, असे सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. केंद्रीय खात्याच्या मदतीने राज्यात अधिक रोजगार उपलब्धतेसाठी मी प्रयत्न करणार आहे. शिवसेनेला कोणावरही टीका करण्याचा अधिकार नाही. गेली ३२ वर्ष मुंबई महानगरपालिकेत ज्यांची सत्ता आहे, त्यांनी मुंबई बकाल केली. मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, झोपडपट्टीचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे, हे सर्व प्रश्न यांनीच निर्माण केले, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidri Sugar Factory : शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला यश ,‘बिद्री’ साखर कारखान्याचा उस दराबाबत 'यु टर्न' ३ हजार ६१४ पहिली उचल एकरकमी देणार

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघावरून महायुतीत धुसफुस

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

SCROLL FOR NEXT