naresh mhaske aditya thackeray
naresh mhaske aditya thackeray sakal
मुंबई

Naresh Mhaske : आपल्या चुका झाकण्यासाठी खोटी वक्तव्य

सकाळ वृतसेवा

ठाणे - एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व आयुष्य हे समाजाच्या सेवेकरीता घालवले आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष विचलित करावे आणि आपल्या चुका झाकाव्यात या करीताच अशी खोटी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. उध्दव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवरील टिका केल्यानंतर मंगळवारी म्हस्के यांना त्यांचा समाचार घेत, हा आरोप केला.

नीच याची व्याख्या म्हणजे पक्षांच्या तत्वांशी, विचारांशी बाळासाहेबांच्या हिंदुत्व विचारांशी ज्यांनी गद्दारी केली, त्यांना नीच बोलतात, ज्यांनी मृतांच्या टाळू वरचे लोणी खाल्ले, कोवीड काळात पैसे लाटले त्यांना नीच बोलतात अशा शब्दात शिंदे सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदीत्य ठाकरे यांच्यावर टिका केली. तसेच उध्दव सेनेच्या मशाल गीतामधील जयभवानी शब्दावरुन देखील त्यांनी ठाकरे यांना डिवचले आहे.

जयभवानी हे उध्दव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना बोलायला लावावे, जय भवानी जय शिवाजी हा आमचा आत्मा असल्याचेही ते म्हणाले. तर संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन त्यांनी उध्दव ठाकरे यांचा बळी दिलाय अशी टिकाही त्यांनी केली.

आम्ही पक्ष नाही फोडला ओरीजनल नाव, पक्ष आणि विचार आम्हाला मिळाले आहेत. उरलेली उध्दव ठाकरे सेना आहे. त्यांनी आतापर्यंत सरकार पडणार म्हणून तारखा दिल्या होत्या. पण हे सरकार खंबीर असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

आदित्य ठाकरेंच्या बॅनरला जोडो मारो आंदोलन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जाणीवपूर्वक खालच्या पातळीवर जाऊन उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली. त्याचा निषेध मंगळवारी दुपारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदे सेनेचे युवासेनेने नोंदवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आक्रमक झालेल्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या बॅनरला जोडो मारो आंदोलन केले.

यावेळी स्टार प्रचारक राहूल लोंढे यांनी सत्ता गेल्यापासून उध्दव आणि आदित्य ठाकरे हे वेडे आणि वैफल्यग्रस्त झाले आहेत. तसेच आदित्य ठाकरे हे उच्च राहणी आणि नीच विचाराचे आहेत. जे स्वतःला जेंटल समजतात ते मेंटल झाले आहेत, असेही लोंढे यांनी म्हटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT