मुंबई

प्रेम प्रकरणातून घणसोलीत तरुणाची हत्या, अल्पवयीन तरुणांसह दोघे ताब्यात

विक्रम गायकवाड

नवी मुंबई : घणसोलीतील तळवली भागात राहणाऱ्या अनिल जयराम शिंदे (20) या तरुणावर अनिकेत रमेश जाधव (19) व त्याच्या अल्पवयीन मित्राने कोयता आणि चाकूच्या सहाय्याने हल्ला करून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  रबाळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे.  प्रेमप्रकरणातून या दोघांनी अनिल शिंदे याची हत्या करून त्याचा मृतदेह घणसोलीतील खाडी किनारी टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे.

या घटनेतील मृत अनिल शिंदे हा   घणसोलीतील तळवली भागात राहण्यास असून त्याची हत्या करणारा अनिकेत जाधव आणि त्याचा अल्पवयीन साथीदार हे नाशिक मधील देवलोली भागात राहण्यास आहेत. यातील आरोपी अनिकेत जाधव हा मृत अनिल शिंदे याच्या प्रेयसीचा नातेवाईक असून तो देखील अनिल शिंदे प्रेम करत असलेल्या तरुणीवर प्रेम करत होता. मात्र सदर तरुणी अनिकेतला भाव देत नव्हती. सदर तरुणीचे अनिल शिंदे याच्यासोबत प्रेमसंबंध  असल्याची माहिती अनिकेतला समजल्याने अनिल शिंदेचा कायमचा काटा काढण्याची अनिकेतने योजना आखली होती.
त्यानुसार गत 5 फेब्रुवारी रोजी रात्री अनिकेत आणि त्याचा 17 वर्षीय अल्पवयीन मित्र या दोघांनी अनिल शिंदे याला फोन करून घणसोली तील फॉर्टी प्लसच्या मैदानात बोलावून घेतले होते. त्यानंतर या दोघांनी त्याला बियर पिण्यासाठी देऊन त्याच्यावर धारधार कोयता आणि चाकूने हल्ला केला. यात अनिल शिंदे मृत पावल्यानंतर या दोघांनी त्याचा मृतदेह घणसोली तील खाडीत टाकून पलायन केले.

दरम्यान, अनिल शिंदे 5 फेब्रुवारी रोजी रात्रीपासून अचानक बेपत्ता झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेऊन रबाळे पोलीस ठाण्यात त्याच्या मीसिंगची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रबाळे पोलिसांनी मृत अनिल शिंदेच्या मोबाईलवर आलेल्या कॉल वरून तपास करून अनिकेत जाधव  व त्याच्या अल्पवयीन मित्र या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला या दोघांनी उडवा उडविची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनीच अनिल शिंदे याची हत्या करून त्याचा मृतदेह घणसोली खाडी किनारी टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री घणसोली खाडी किनारी जाऊन अनिल शिंदे याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला.
चौकट
आरोपी अनिकेत जाधव याने आपली ओळख पटू नये यासाठी  एका वकिलाच्या फोन वरून अनिल शिंदे याला फोन करून घणसोलीतील फोर्टी प्लसच्या मैदानात बोलावून घेतले होते. त्यानुसार अनिल शिंदे मैदानात आल्यानंतर अनिकेत आणि त्याच्या अल्पवयीन मित्राने त्याची हत्या करून त्याचा मृतदेह खाडीत टाकून पलायन केले होते. रबाळे पोलिसांनी बेपत्ता अनिल शिंदे याचा शोध घेताना, त्याच्या मोबाईलवर आलेल्या शेवटच्या कॉलचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यात वकिलचा शेवटचा कॉल आल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी वकीलाकडे त्यावबाबत चौकशी केली. त्यानंतर अनिकेतने त्यांच्या मोबाईल फोनचा वापर केल्याची माहिती वकिलाने दिली. त्यानंतर पोलिसांनी अनिकेतला व त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन या हत्या प्रकरणाची उकल केली.

-------------------------------------------------

navi mumbai crime marathi young man passaway love affair latest updates

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

SCROLL FOR NEXT