Navi Mumbai Sakal
मुंबई

Navi Mumbai: केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून वाशीतील व्यक्तीकडुन उकळले 80 लाख

वाशीमध्ये राहणाऱया एका 63 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला त्यांच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये स्मग्लींगचे साहित्य असल्याचे सांगून..... पोलिसांकडुन शोध सुरु

सकाळ वृत्तसेवा

Crime News: सायबर क्राईमचे पोलीस, आरबीआय, ईडी व फायनान्स मिनीस्ट्रीचे अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने वाशीमध्ये राहणाऱया एका 63 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला त्यांच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये स्मग्लींगचे साहित्य असल्याचे सांगून सदर प्रकरणात त्यांना अटक करण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून तब्बल 80 लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Cybercrime mumbai )

नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळी विरोधात फसवणुकीसह बनावटगीरी तसेच आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन या टोळीचा शोध सुरु केला आहे. (Filed a case)

या प्रकरणात फसवणूक झालेले ज्येष्ठ नागरीक वाशी सेक्टर-29 मध्ये राहण्यास असून गत आठडयामध्ये या व्यक्तीला सायबर टोळीने फेडेक्स पार्सल डिलिव्हरी कंपनी मधून बोलत असल्याचे भासवून संपर्क साधला होता. तसेच त्यांच्या नावाने त्यांच्याकडे आलेल्या पार्सलमध्ये स्मग्लींगचे साहित्य आढळुन आल्यामुळे त्याबाबत सायबर क्राईम पोलिसांकडे त्यांची तक्रार करण्यात आल्याचे सांगून त्यांना भीती घातली होती.(Vashi Sector-29)

त्यानंतर सायबर टोळीतील इतर गुन्हेगारांनी सायबर क्राईम विभागाकडुन बोलत असल्याचे भासवून स्काईप ऍपद्वारे या ज्येष्ठ नागरिकाला संपर्क साधला. त्यानंतर सायबर टोळीने या ज्येष्ठ नागरिकाला आरबीआय, ईडी व फायनान्स मिनीस्ट्रीचे बनावट पत्र पाठवून त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याची व त्यात त्यांना अटक करण्याची धमकी दिली.(Fake letter from ED and Finance Ministry)

त्यानंतर या कारवाईपासून वाचण्यासाठी तसेच त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची संपत्ती व्हेरीफिकेशन करण्याच्या नावाखाली त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास भाग पाडले. तसेच त्यांच्याकडुन टप्प्या टप्प्याने एकुण 80 लाख रुपये उकळले.

त्यानंतर या टोळीने आपले मोबाईल फोन बंद करुन टाकल्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे या ज्येष्ठ नागरीकाला लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार सायबर पोलिसांनी या प्रकरणातील टोळीचा शोध सुरु केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT