मुंबई

Navi Mumbai AirPort: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव, अंतिम ठराव पंतप्रधान कार्यालयात

Pavel News: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांची लढाई अखेर निर्णायक टप्प्यात आली आहे. दिल्लीमधील केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी झाली.

या बैठकीत नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर सकारात्मक चर्चा झाली आहे. याविषयीचा अंतिम ठराव पंतप्रधान कार्यालयात आणि कॅबिनेटमध्ये झाल्यानंतर त्याबाबत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती मंत्रिमंडळाकडून देण्यात आली आहे.

दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी केलेल्या संघर्षाची जाणीव पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला पाठवला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

मोदी सरकार हे देशातील भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांचा सन्मान करणारे सरकार असून केंद्र सरकार त्या प्रस्तावाला नक्कीच मंजुरी देईल, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाने दोन्ही सभागृहांत ठराव मंजूर केला आहे. विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या बैठकीत मंत्र्यांनी स्पष्ट केले की, लोकनेते दि. बा. पाटील साहेबांच्या नावाव्यतिरिक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी इतर कुठल्याही नावाचा प्रस्ताव आलेला नाही.

या बैठकीत माजी मंत्री कपिल पाटील, जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार संजीव नाईक, मनसे आमदार राजू पाटील, शेकापचे नेते जे. एम. म्हात्रे, संतोष केणे यांच्यासह ठाणे, रायगड आणि नवी मुंबईतील नेत्यांचा समावेश या शिष्टमंडळात होता.

---------

दिबांच्या संघर्षामुळे नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली आहे. या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करून सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करेल. लवकरच नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करेल.

- किंजरापू राम मोहन नायडू, नागरी विमान वाहतूक मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman in Cave : परदेशी लोकांना भारत स्वर्गासारखा, 'त्या' रशियन महिलेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने असे का म्हटले?

Miraj Dangal : मिरजेत दोन गटांत राडा, जातीविषयी द्वेष निर्माण करणारे वक्तव्य; नेमकं रात्री काय घडलं?, पोलिसांची भूमिका काय

Laxmi Niwas : अखेर तो क्षण आलाच ! जान्हवी शिकवणार जयंतला धडा; लेखिकेचंही कौतुक करत प्रेक्षक म्हणाले "ज्जे बात !"

Latest Marathi News Live Update : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा रुग्णालयात दाखल; आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Pune Weather Update : पुण्यात तापमानाचा पारा चढला, पुढील काही दिवसांत उकाडा वाढणार

SCROLL FOR NEXT