नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे  
मुंबई

नवी मुंबई मनसे शहर अध्यक्षावर पत्नीनेच केला अनैतिक संबंधांचा आरोप

गजानन याचे काही महिलासोबत अनैतिक संबंध असल्याचे व तो अनेक मुलीशी प्रेमाच्या अश्लील गोष्टी करत असल्याचे त्याच्या फोन कॉल व मेसेज वरून समजल्याच पत्नीने म्हटलं आहे.

विक्रम गायकवाड

नवी मुंबई : नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे (Navi mumbai mns city chief gajanan kale) यांच्याकडून मानसिक व शारीरिक छळ (mental and physical harassment) करण्यात येत असल्याची तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने (wife file complaint) केली आहे. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी (nerul police) गजानन काळे यांच्या विरोधात छळवणुकीसह इतर कलमाखाली गुन्हा दाखल केल्यामुळे नवी मुंबईत आणि मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

मागील काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याची तक्रार गजानन काळे यांच्या पत्नीने केली आहे. गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याचेही त्याच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

2008 मध्ये लग्न झाल्यानंतर 15 दिवसांतच गजाननने किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करून सावळा रंग व जातीवरून आपल्याला टोमणे मारून जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे तसेच गजानन याने आपल्याला मारहाण केल्याचे देखील त्याच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे.

गजानन याचे काही महिलासोबत अनैतिक संबंध असल्याचे व तो अनेक मुलीशी प्रेमाच्या अश्लील गोष्टी करत असल्याचे त्याच्या फोन कॉल व मेसेज वरून समजल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याबाबत विचारणा केल्यानंतर गजानन या गोष्टीवरून भांडण करुन मारहाण करत असल्याचे देखील त्यांच्या पत्नीने तक्रारीत स्पष्ट केले आहे. या तक्रारीवरून नेरुळ पोलिसांनी गजनान काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकारानंतर मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT