Ghatkopar hoarding Esakal
मुंबई

Mumbai Rain Accident: घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले, जवळपास 80 गाड्या दबल्या, अनेकजण अडकल्याची भीती

Ghatkopar hoarding collapse: होर्डिंगखाली , अनेकजण दबल्याची भीती

कार्तिक पुजारी

Rain Update: मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. घाटकोपर हायवे पोलीस क्वार्टर पेट्रोल पंप येथील होल्डिंग पडल्यामुळे काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेकजण होर्डिंग खाली दबले गेले आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साडेचार वाजता हा अपघात घडला आहे. घाटकापोर पूर्व येथील पंतनगरमध्ये पूर्व हायवेवर पोलीस ग्राऊंड पेट्रोल पंप आहे. येथे हा अपघात घडला आहे. होर्डिंग ही थेट पेट्रोल पंपावर कोसळली. होर्डिंगचा आकार मोठा होता. अनेक वाहने, पेट्रोल पंपावरील कर्मचारी होर्डिंग खाली दबले गेले असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच, पोलीस, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पाऊस सुरु असल्याने मदतकार्याला वेळ लागत आहे. अनेकजण होर्डिंग आणि पेट्रोल पंपाखाली दबले गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. जीवितहानीबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सात ते आठ जणांना होर्डिंग खालून बाहेर काढण्यात आलं आहे. जवळपास ८० गाड्या होर्डिंगखाली दबल्या गेल्या आहेत. यावरुन होर्डिंगच्या आकाराचा अंदाज आपल्याला बांधता येईल. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये देखील काही माणसं होती. होर्डिंग लोखंडी असल्याने बचावकार्याला वेळ लागण्याची शक्यता आहे.

जवळपास १०० जण यात अडकल्याची माहिती आहे. दुर्घटना मोठी आहे, शिवाय होर्डिंग हटवणे मोठं कठीण काम आहे. पेट्रोल पंप असल्याने कटरचा वापर करण्यास मर्यादा येत आहेत. त्यात वरून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं आहे. घटनास्थळी दुर्घटनाग्रस्त व्यक्तींचे कुटुंब पोहोचू लागले आहेत. काही गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. रात्रभर किंवा उद्यापर्यंत बचावकार्य सुरू राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT