मुंबई

Navi Mumbai : अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीची १४व्या मजल्यावरुन उडी!

सकाळ डिजिटल टीम

अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने बारावीतील एका विद्यार्थिनीने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कृतिका चव्हाण (वय १७) असे या विद्यार्थिनीचे नाव असून गुरुवारी दुपारी ही घटना विटावा येथील ग्रीन वर्ल्ड सोसायटीत घडली. रबाळे पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

घटनेतील मृत कृतिका ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती. कृतिकाला मेडिकल क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असल्याने ती बारावीच्या अभ्यासाबरोबरच नीट प्रवेश परीक्षेचादेखील अभ्यास करत होती. गुरुवारी (ता. २६) दुपारी कृतिका आपल्या बेडरूममध्ये होती; तर तिची आई व घरकाम करणारी बाई या घरातील हॉलमध्ये होत्या. या वेळी कृतिकाने बेडरूमच्या गॅलरीमधून खाली उडी मारली.

या वेळी मोठा आवाज झाल्याने कृतिकाच्या आईने बेडरूममध्ये जाऊन बघितले असता ती खाली पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत कृतिका ही अभ्यासाच्या तणावात असल्याचे समोर आले. त्यातूनच तिने बेडरूमच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रबाळे पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत तायडे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT