नवी मुंबईकरांकडून मनसोक्त सायकलिंग!
नवी मुंबईकरांकडून मनसोक्त सायकलिंग! 
मुंबई

नवी मुंबईकरांकडून मनसोक्त सायकलिंग!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महापालिकेने सुरू केलेल्या ‘जन सायकल सहभाग प्रणाली’ या पर्यावरणपूरक सायकल प्रकल्पाला एक वर्षानंतरही लोकप्रियता कायम आहे. एका वर्षात तब्बल ७५ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सायकल सेवेचा लाभ घेतला. पूर्वी फक्त व्यायाम करण्यापुरतेच वापरली जात असलेली सायकल आता कार्यालय, रेल्वेस्थानके, बस डेपोपर्यंत पोहोचण्यासाठी वापरली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 
 
शहरात अडथळामुक्त पदपथ व रस्ते तयार करण्यासाठी महापालिका तत्कालिन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी विशेष पुढाकार घेऊन पदपथ मोकळे करण्याचे काम सुरू केले होते. तसेच नागरिकांनी प्रवासासाठी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा करावा. याकरिता रामास्वामींप्रमाणेच विद्यमान आयुक्त अण्णासाहेब मिसाळ हेदेखील आग्रही आहेत. त्यामुळे रामास्वामी यांच्या काळात सुरू केलेली युलू सायकल सेवा मिसाळ यांच्या काळात अधिक लोकप्रिय ठरत चालली आहे. गेल्या वर्षी नेरूळ, सेक्‍टर २८ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथून सायकल सेवेला सुरुवात झाली होती. आता या सायकलला लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून शहरात तब्बल ९२ ठिकाणी सायकल थांबे निर्माण केले आहे. ही सायकल सेवा खासगी संस्थेमार्फत चालवली जात असली, तरी सर्वांना परवडेल. अशा माफक दरात सायकल उपलब्ध आहे. सायकल वापरल्याची रक्कम ॲप्सच्या सहाय्याने थेट बॅंक खात्यांमधून वळती होत असल्याने तब्बल ७५ हजार लोकांनी या सायकलचा वापर केल्याचे समोर आले आहे. सायकलप्रमाणे शहरात नव्याने आणलेल्या बॅटरीवरील इलेक्‍ट्रिक बाईकलाही नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. एका चार्जमध्ये ४० ते ४५ किमीपर्यंत धावणाऱ्या या बॅटरीवरील सायकलचा अनेकांनी कार्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग केल्याचेदेखील समोर आले आहे. 

चाकरमानी व विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक वापर
पालिकेने सुरू केलेल्या जनसहभाग सायकल प्रकल्पातील सायकलचा पूर्वी फक्त व्यायाम करण्यासाठी केला जात होता; मात्र आता चाकरमान्यांसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. २२ टक्के लोक कार्यालयात जाण्यासाठी सायकल वापर आहेत; तर १४ टक्के विद्यार्थी महाविद्यालयात व शाळेत जाण्यासाठी सायकलचा वापर करीत आहेत. फक्त १६ टक्के लोक व्यायाम म्हणून सायकलचा वापर करताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT