मुंबई

परदेशी तस्करांबाबत NCB करणार तपासणी

अनिश पाटील

मुंबई:  ड्रग्स तस्करीप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाला (एनसीबी) कोकेन तस्करीत परदेशी तस्करांचा संबंध सापडला असून त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.

एनसीबीने दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोड येथे छापा टाकून ब्रुनो जॉन न्ग्वाले या टान्झानियन नागरीकाला चार ग्रॅम कोकोनसह अटक केली होती. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून 4.40 ग्रॅम इक्स्टसी आणि 1.88 ग्रॅम एमडीएमए वर्सोवा येथून जप्त करण्यात आली. याप्रकरणी रोहित हिरे नावाच्या आरोपीलाही अटक करण्यात आली होती. ब्रुनो हा परदेशी नागरिक कोकेन वितरक असल्याची माहिती आतापर्यंतच्या चौकशीतून निष्पन्न झाली आहे. ही सर्व कोकेन परदेशातून कुरिअर मार्फत येत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या कोणत्याही व्यवहारात विक्रेत्याचा प्रत्यक्ष सहभाग येत नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्‍य नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या वितरणासाठी कुरियर सर्विसचा वापर होत असल्यामुळे ग्राहक आणि  विक्रेता यांच्यात कोणाताही संबंध उतर नाही. परिणामी आरोपींकडे पोहोचणे जवळपास अशक्य झाले आहे.

याशिवाय लोणावळा पोस्ट ऑफिस येथून हे पार्सल जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एक हजार 110 ग्रॅम गांजा जप्त करण्यता आला आहे. त्यातील तस्करीतही परदेशी टोळीशी संबंध निष्पन्न झाला आहे. परदेशातील गांजा येथील रेव्ह पार्ट्यांमध्ये मोठ्याप्रमाणात प्रचलित आहे. त्यामुळे परदेशी तस्करांच्या संबंधाबाबतही एनसीबी तपास करत आहे.

-------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

NCB to investigate foreign smugglers

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT