मुंबई

दादर, भिवंडीमध्ये NCBचा छापा; १७ किलो चरस जप्त

४ लाखांची रोकड हस्तगत; ७ जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

१७ किलो चरस जप्त; ७ जणांवर कारवाई

मुंबई: दादर (Dadar) येथील एका धार्मिक स्थळातून चार संशयितांना केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) अटक केली असून आरोपींकडून दोन किलो चरस (Charas Drugs) व दोन लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. कमलेश गुप्ता, अमित पटेल, राजविंदर सिंग व गुरमीत सिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची (Culprits) नावे आहेत. याशिवाय, भिवंडीतही (Bhiwandi) पडघा येथे केलेल्या कारवाईत शब्बीर शेख व निझामुद्दीन ताझा या दोघांना 12 किलो चरससह अटक करण्यात आली. NCBच्या छाप्यात एकूण ४ लाख ४० हजारांची रोकड आणि १७.३ किलो चरस जप्त करण्यात आला. (NCB raids in Dadar Bhiwandi area 17.3 Kg Charas Drugs seized 7 people intercepted arrested)

NCB ने दादर, परेल, ठाणे, ताडदेव परिसरात छापेमारी करण्यात आली आहे. दादर येथील एका धार्मिक स्थळामधील लॉजिंग खोलीत चरसची खरेदी-विक्री करत असल्याची माहिती NCBला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता आरोपी चरसची खरेदी विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यावेळी दोन लाख रोख व कमलेश गुप्ताच्या खोलीतून दोन किलो चरस जप्त करण्यात आले.आरोपी राजविंदर सिंग व गुरमीत सिग दोघेही पंजाबवरून दुचाकीवरून प्रवास करत मुंबईत चरस घेऊन आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ते जम्मू काश्मिर येथून चरस आणायचे. त्यानंतर कमलेश गुप्ताच्या माहितीवरून चुनाभट्टी येथील घरातून शोध मोहिम राबवली असता तेथून आणखी दोन लाख 20 हजार रोख व सव्वातीन किलो चरस जप्त करण्यात आली.

तर, भिवंडी येथील पडघा येथे केलेल्या कारवाईत शब्बीर शेख व निझामुद्दीन ताझा या दोघांना 12 किलो चरससह अटक करण्यता आली. आरोपींनी ती चरस जम्मू व काश्मीर येथून आणली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी आरोपींच्या शोधात होते. पण ते त्यांची ठिकाण बदलत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT