ncp
ncp 
मुंबई

Loksabha 2019: राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 उमेदवार जाहीर; राजू शेट्टींना घड्याळाची साथ

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत पार्थ पवार यांचे नाव नाही. एकूण दहा दहा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता. 13) ही उमेदवारांची यादी जाहीर केली.

परभणीतून राजेश विटेकर जळगांवमधून गुलाबराव देवकर, बुलढाण्यामधून राजेंद्र शिंगणे, साताऱ्यामधून खा. उदयनराजे भोसले ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील
, बारामतीमधून खा. सुप्रिया सुळे रायगडमधून सुनिल तटकरे, कोल्हापूरमधून खा. धनंजय महाडिक ठाण्यातून आनंद परांजपे  कल्याणमधून बाबाजी बाळाराम पाटील तर लक्षद्विपमधून खा. मोहम्मद फैजल अशी राष्ट्रवादीची पहिल्या दहा उमेदवारांची यादी आहे.

तसेच, हातकणंगले लोकसभा मतदार संघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली असल्याचे जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. परंतु, स्वाभिमानी शेतकरी संघठनेने दावा केलेल्या बुलढाणा लोकसभेसाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला असून या कारणाने महाआघाडीत यादीवरून असंतोषाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

परभणी - राजेश विटेकर
जळगांव - गुलाबराव देवकर
बुलढाणा - राजेंद्र शिंगणे
सातारा - उदयनराजे भोसले 
ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील
बारामती - सुप्रिया सुळे
रायगड - सुनिल तटकरे 
कोल्हापूर - धनंजय महाडिक 
ठाणे - आनंद परांजपे 
कल्याण - बाबाजी बाळाराम पाटील 
लक्षद्विप - मोहम्मद फैजल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT