Sharad_20Pawar_20and_20ED_20inquiry.jpg 
मुंबई

शरद पवार यांची प्रकृती ठणठणीत, रुग्णालयातून घरी परतले

सकाळवृत्तसेवा

मुंबई- ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी (दि.3) सकाळी शरद पवार हे रुग्णालयातून घरी परतले. त्यांची प्रकृती ठणठणीत असून ते स्वतः गाडीतून उतरुन घरात गेले. त्यांना पोटात दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये पित्ताशयाचा त्रास असल्याचे समोर आले होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  दरम्यान, येत्या काही दिवसांत त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. 

प्रकृतीत सुधारणा झाल्याने शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. 

पवार यांच्या पित्तनलिकेच्या मुखाशी असलेला खडा काढण्यात आला होता. शस्त्रक्रियेनंतर दोन ते तीन दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, शरद पवार यांच्यावर येत्या 8 ते 10 दिवसांत आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, डॉक्टरांनी शरद पवार यांची तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर राहिल्यास त्यांच्या गाल ब्लॅडरची शस्त्रक्रिया केली जाईल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

Crime News : नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! सातपूरमध्ये २५ लाखांच्या मुद्देमालासह ७ जणांना बेड्या

Prajwal Revanna Case : 13 हजार पानांचं आरोपपत्र, 70 पेनड्राइव्ह, 39 आरोपी अन् अंगावर काटा आणणारे पुरावे; माजी खासदाराच्या 'त्या' अश्लील व्हिडिओंचं सत्य समोर!

माझी ओळख, माझे नाव, माझा चेहरा... गौतम गंभीरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; २.५० कोटींचा नुकसानीचा दावा, नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT