anil gote esakal
मुंबई

Anil Gote: 'फार आश्चर्य वाटलं नाही' गोटेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया

Anil Gote: माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे यांनी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anil Gote

मुंबई- माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे यांनी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपविला असल्याचं गोटे म्हणाले. तसेच सध्यातरी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे ते म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसते नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल गोटे यांच्या राजीनाम्यानंतर फार आश्चर्य वाटलं नाही. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. राष्ट्रवादीत आल्यावर त्यांनी कुणाला प्राध्यान्य दिले नाही. पण, नेमकं कशामुळे ते राजीनामा देत आहेत हे मला माहिती नाही, असं खडसे म्हणाले. धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन गोटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला होता.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं. काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या खासदारांची बैठक आयोजित केली होती. त्यांनी ते जे सांगितलं ते असत्य आहे. 2014 ला शिवसेनेने युती तोडली असं ते म्हणाले. मी त्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण झालं होतं. त्यावेळेस भाजप सेनेचे सरकार येईल असा विश्वास आम्हाला होता. त्यावेळेस अनेक लोकं भाजपमध्ये यायला लागले होते, तिकीट मागायला लागले होते, असं ते म्हणाले.

भाजपने एकट्याने निवडणुका लढवाव्या असे सर्वांचे मत झालं. 2 अडीच महिन्यापूर्वी हा निर्णय झाला आणि भाजपने युती तोडली. त्यावेळी सुधिर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस आणि मी पण होतो. त्यावेळेस हे कोणी आणि कसं सांगावं यावर आमच्यात खल झाला. त्यावेळेस माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. मी उद्धव ठाकरे यांना फोन करून तसं सांगितलं. जागा वाटपावरून जमत नसल्याचे कारण सांगून मी ती युती तोडली, असा खुलासा खडसे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT