Sharad Pawar sakal
मुंबई

शरद पवारांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

पुढचे तीन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते उपचार घेत असल्याचं राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पुढचे तीन दिवस ते याच रुग्णालयात उपचार घेणार आहेत.

Sharad Pawar

राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल."

त्यांचे पुढचे कार्यक्रम नियोजनाप्रमाणे होतील, असंही निवेदनात म्हटलं आहे. ३ नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असं आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT