ncp sharad pawar sakal
मुंबई

Ncp Sharad Pawar Mumbai : सुमारे ५० हजार पुस्तिका काढणार ; राज्य सरकारच्या विरोधात निकाल वाचनाची राष्ट्रवादीची मोहीम..!

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हा संपूर्ण निकाल असून केवळ घटनात्मक स्वायत्त संस्थांच्या कार्यक्षेत्रावर आक्रमण नको म्हणून या बेकायदा सरकारच्या घटनात्मक वैधतेची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ncp Sharad Pawar Mumbai - राज्यातील बहुचर्चित सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा निकाल सोप्या भाषेत समजावून सांगण्याची अभिनव मोहीम राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आजपासून सुरू केली.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सामान्य नागरिकांना पूर्णपणे वाचता येत नाही. त्यामुळे या निकालाचे शब्दशः वाचन करून ते मराठीमध्ये समजावून सांगत शिंदे-फडणवीस सरकार हे कसे बेकायदा, अनैतिक आहे, यावर राज्यस्तरीय मोहीम राष्ट्रवादीने आजपासून सुरू केली.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने ‘चला या... सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊया’ या परिसंवादात जितेंद्र आव्हाड यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात केली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सोप्या भाषेत निकालाचे विश्लेषण करून सांगितले. शिवाय व्हीप कुणाचा लागू होतो आणि हे सरकार कसे असांविधानिक आहे याचे दाखले सर्वोच्च न्यायालयाने या निकालात स्पष्टपणे दिल्याचे त्यांनी सप्रमाण स्पष्ट केले.

आव्हाड म्हणाले, की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हा संपूर्ण निकाल असून केवळ घटनात्मक स्वायत्त संस्थांच्या कार्यक्षेत्रावर आक्रमण नको म्हणून या बेकायदा सरकारच्या घटनात्मक वैधतेची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यंत विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत या सरकारच्या विरोधातच निवाडा द्यावा लागेल, असा दावा आव्हाड यांनी केला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या ५० हजार पुस्तिका काढून लोकांपर्यंत पोचविणार असल्याचेही आव्हाड यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT