ncp women agitation sakal
मुंबई

NCP Womens Agitation : मुंबईत बाबा रामदेवांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे जोडेमारो आंदोलन

बाबा रामदेव यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने बाबा रामदेव बाबा विरोधात जोडे मारो आंदोलन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

बाबा रामदेव यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने बाबा रामदेव बाबा विरोधात जोडे मारो आंदोलन केले आहे.

मुंबई - बाबा रामदेव यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने बाबा रामदेव बाबा विरोधात जोडे मारो आंदोलन केले आहे. शनिवारी बाबा रामदेव यांच्या फोटोला महिला कार्यकर्त्यांनी येथे जोडे मारत आंदोलन केले. रामदेव बाबाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय... रामदेवबाबा हाय हाय... समस्त महिला भगिनींचा अपमान करणार्‍या रामदेव बाबाचा निषेध असो... मुखी राम राम बोला... याला जोड्याने हाणा... अशा जोरदार घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेवच्याविरोधात शनिवारी आंदोलन करण्यात आले.

मुंबई प्रदेश कार्यालयासमोर मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे,प्रदेश संघटक सचिव भालचंद्र शिरोळे, मुंबई युवती अध्यक्षा आदिती नलावडे, सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, मुंबई मिडिया समन्वयक दिपक पारडीवाला, उत्तर मध्य मुंबईच्या जिल्हाध्यक्षा सुरैना मल्होत्रा, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्षा समृद्धी जंगम, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा वैशाली कडणे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, महिला, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT