mumbai.jpg
mumbai.jpg 
मुंबई

शिवसेना-भाजपा युतीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची जाहीर सभा

रविंद्र खरात

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्द म्हटले की, शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला समजला जातो , लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर भाजपा , शिवसेना नेत्याच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन कार्यक्रम पार पडल्यानंतर आता शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तनाचा जाहीर सभा कल्याण पूर्व मध्ये सोमवार (ता. 14) जानेवारी दुपारी 4 वाजता चक्की नाका परिसरात होणार असून ही सभा यशस्वी होण्यासाठी स्थानिक नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे . 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली अश्या चार विधानसभा मतदार संघाचा समावेश होत असून यात दोन लोकसभा मतदार संघाची हद्द येते. भिवंडी लोकसभा मध्ये भाजपाचे खासदार कपिल पाटील, कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे, डोंबिवली आमदार राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण ग्रामीण शिवसेना आमदार सुभाष भोईर, कल्याण पूर्व भाजपाला समर्थन दिलेले आमदार गणपत गायकवाड, कल्याण पश्चिम मध्ये भाजपाचे आमदार नरेंद्र पवार आहेत. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सपाटून मार खाल्ला त्यांचे फक्त 2 नगरसेवक निवडून आले मात्र ते कोणा सोबत आहे हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे . 

आगामी लोकसभा निवडणूक पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण मध्ये मेट्रोचे भूमीपूजन केले त्या पाठोपाठ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते भिवंडी कल्याण शिळफाटा सहा पदरी रस्ता रुंदीकरण आणि उड्डाण पूल, पत्रिपुल कामाचे भूमीपूजन केले त्याला काही दिवस होत नाही तोच शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सिटी पार्कच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. शिवसेना भाजपा पाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष आपली ताकद दाखविण्याची शक्यता आहे . 

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जनजागृती राज्य व्यापी परिवर्तन यात्रा मार्फत जाहीर सभा विविध शहरात होत असून सोमवार ता 14 जानेवारीला निर्धार परिवर्तनाचा जाहीर सभा कल्याण पूर्व मध्ये चक्की नाका जवळील मैदानात होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. कल्याण पूर्व मध्ये गलोगल्ली नेत्यांचे स्वागत पोस्टर लागले असून ,यासभेला माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , छगन भुजबळ , प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गणेश नाईक , महिला प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फोजिया खान आदी नेते मंडळी उपस्थित राहणार ते काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष्य लागले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT