dog bite dog bite
मुंबई

शेजाऱ्याचा कुत्रा दिवसरात्र भुंकतो; दोन बहिणी न्यायालयात

दोन वयोवृद्ध बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

केतन पळसकर

नागपूर : शेजाऱ्याचा कुत्रा दिवसरात्र भुंकत राहतो म्हणून, त्रिमूर्तीनगरातील दोन वयोवृद्ध बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. मालती (६६) व नलिनी (६८) राहगुडे (रा. त्रिमुर्तीनगर) अशी याचिकाकर्त्या बहिणींची नावे आहेत. संबंधित कुत्रा जर्मन शेफर्ड जातीचा असून तो धीरज डहाके यांच्या मालकीचा आहे.

याचिकेनुसार, हा कुत्रा सकाळी ६.३० वाजतापासून घरी येणारा पेपरवाला, दुधवाला, भाडेकरू व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांवर जोरजोरात भुंकायला सुरवात करतो. त्याचा हा उपद्रव रात्री १० वाजतापर्यंत सुरू असतो. भारतीय पशू कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मालकाने त्याच्या पाळीव कुत्र्यांना गप्प ठेवण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे, कुत्र्याला आवरण्यासाठी डहाके कुटुंबीयांना अनेकदा विनंती केली, पण त्यांनी काहीच ठोस उपाय केले नाही. महानगरपालिका व पोलिसांनीही तक्रारींची दखल घेतली नाही. या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे जगणे कठीण झाले आहे, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.

याचिकाकर्त्या बहिणी आजारी असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, धीरज यांच्या आई पंचफुला डहाके यांनी न्यायालयात उत्तर सादर करून याचिकेतील आरोप फेटाळले आहेत. या कुत्र्याला १० वर्षापासून पाळत आहे. कुत्रा अतिशय हुशार आहे. तो आज्ञेचे पालन करतो. घराच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. परंतु, याचिकाकर्त्या बहिणी जाणीवपूर्वक सतत तक्रारी करून मानसिक त्रास देतात. कुत्र्याने आतापर्यंत कुणालाही दुखापत केली नाही, असे डहाके यांनी स्पष्ट केले आहे.

महानगरपालिकेने स्वत:ची भूमिका स्पष्ट करताना, केवळ पाळीव कुत्रा भुंकतो म्हणून कारवाई केली जाऊ शकत नाही, अशी माहिती दिली. धीरज डहाके यांच्याकडे कुत्रा पाळण्याचे कायदेशीर लायसन्स आहे. मालकाने पाळीव कुत्र्याला सार्वजनिक ठिकाणी मोकळे सोडले तरच, कायद्यानुसार कारवाई करता येते. याचिकाकर्त्यांची तक्रार या स्वरूपाची नाही. परिणामी, याचिका फेटाळण्यात यावी, अशी विनंती महानगरपालिकेने केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. शेख सिबघतुल्ला जागीरदार यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT