corona
corona 
मुंबई

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव थांबता थांबेना; आज तब्बल 'इतके' नवे रुग्ण..जाणून घ्या आकडेवारी 

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत आज 1282 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 88,795 झाली आहे. तर आज 68 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 5,129 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 513 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

हेही वाचा: खासगी विमान कंपन्यांकडून आता प्रवाशांना 'ही' विशेष ऑफर; स्पाईस जेटची महत्वाची घोषणा..
                                                      
मुंबईत आज नोंद झालेल्या 68 मृत्यूंपैकी  27 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 37 पुरुष तर 31 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी  3 जणांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 43 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 22 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                                          

मुंबई संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 820 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 61,831 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 513 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  59,751 रुग्णांना घरी सोडण्यात आले.  

मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 67 टक्के इतका आहे. तर 8 जुलै पर्यंत एकूूूण 3,74,142 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 2 जुलै ते 8 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.49 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा 47 दिवसांवर गेला आहे.

संपादन : अथर्व महांकाळ  

new 1282 corona patients in mumbai read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT